ताज्या घडामोडीमनोरंजन

ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त बारसवाडा शाळेत आजी-आजोबा मेळावा संपन्न

ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त बारसवाडा शाळेत आजी-आजोबा मेळावा संपन्न.

अंबड प्रतिनिधी :- ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बारसवाडा तालुका अंबड येथे आजी आजोबा मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्यासाठी अध्यक्ष म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राधाकिसन सावंत प्रमुख पाहुणे म्हणून रामेश्वर खंडागळे तर कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून डोणगावचे केंद्रप्रमुख रामेश्वर आंबटकर, मुख्याध्यापक सुभाषराव चाटे हे लाभले होते. कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने व

दिपप्रज्वलनाने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डोणगावचे केंद्रप्रमुख रामेश्वर आंबटकर यांनी केले. यात आजी आजोबा मेळाव्याचा उद्देश त्यांनी विशद केला. तत्पूर्वी आजी आजोबांचे शाळेच्या प्रवेशद्वारातून पायघड्या घालून पुष्पांचा वर्षाव करून सनईच्या मंजूळ स्वरामध्ये शालेय परिसरात सहर्ष स्वागत केले. शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या आजी आजोबांचे पाद्यपूजन औक्षवण करून पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.यावेळी आजी आजोबासाठी संगीत खुर्ची व उखाणे स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

आजी आजोबांनी निरनिराळे अभंग याप्रसंगी सादर केले. शाळेचे मुख्याध्यापक सुभाषराव चाटे यांनी विजेत्या आजी आजोबांना बक्षीस वाटप केले.शाळेमध्ये एक आनंददायी वातावरण निर्माण झाले होते.तत्पूर्वी स्वच्छता सेवा पंधरवाडा निमित्त डोणगाव केंद्राचे केंद्रप्रमुख रामेश्वर आंबटकर, सरपंच रामेश्वर खंडागळे पोलीस पाटील जगन्नाथ माळकरी, चेअरमन अर्जुनराव गायकवाड यांनी स्वच्छता जनजागृती रॅलीची सुरुवात हिरवा झेंडा दाखवून केली.विद्यार्थ्यांनी विविध स्वच्छता विषयक जनजागृती पर घोषणा दिल्या.

एक मूल एक झाड या उपक्रमाची सुरुवात शालेय परिसरात वृक्षारोपण करून करण्यात आली. त्याचबरोबर इयत्ता पहिली ते तिसरीच्या विद्यार्थ्यांच्या मातांचा महिला मेळाव्याचे आयोजन यावेळी करण्यात आले. शाळेतील शिक्षक श्रीधर कुलकर्णी यांनी आपली स्वरचित कविता पिकले पान सादर करून उपस्थितांची मने जिंकली. तसेच शिक्षक अर्जुन खोंडे यांनी आजी आजोबांचे महत्व भाषणातून विशद केले. लहू गोल्हार यांनी शाळेसाठी संत भगवानबाबा यांची प्रतिमा भेट म्हणून दिली.

शाळेचे मुख्याध्यापक श्री सुभाषराव चाटे यांनी या नाविन्यपूर्ण उपक्रमास प्रतिसाद दिल्याबद्दल उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाचे बहरदार सूत्रसंचालन संतोष सावंत यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गोकुळ बोबलट,सुरेखा जाधव यांच्यासह सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.यावेळी माजी सरपंच किसनराव गायकवाड, भानुदास भोळे,नारायण घाडगे,बाळू वाघ, अंगणवाडी सेविका लता मुळे, कविता शेंडगे आदी पालक ग्रामस्थ उपस्थित होते.

Share now