ताज्या घडामोडीमनोरंजन

शिक्षक दिनानिमित्त उमरा ग्रामस्थांनी केला गावातील शिक्षकांचा सन्मान

 

पाथरी प्रतिनिधी. 5 सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त उमरा ग्रामस्थांनी केला गावातील शिक्षकांचा सन्मान 2023 मंगळवार रोजी शिक्षक दिना निमित्त पाथरी तालुक्यातील उमरा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व जय किसान माध्यमिक विद्यालय उमरा येथील शिक्षकांचा ग्रामस्थांकडून सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.


यावेळी सर्वप्रथम डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले .
यानंतर दोन्ही शाळेच्या शिक्षकांचा ग्रामस्थाकडून सत्कार करण्यात आला. त्यानंतर दोन्ही शाळेच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांबद्दल असणाऱ्या आपल्या भावना व्यक्त केल्या


होतकरू विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करून त्यांच्या जीवनाला आकार देण्याचे काम हे शिक्षक करत असतात. शिक्षकांमुळे समाजाची व राष्ट्राची जडणघडण होते, शिक्षक हा समाजातील एक प्रमुख घटक आहे भावी पिढी घडवण्याचे अनमोल कार्य शिक्षकांच्या हातून होत असते, म्हणूनच शिक्षकांना प्रेरणा देण्यासाठी समाजाने पुढाकार घ्यायला हवा .उत्कृष्ट शिक्षणामुळेच राष्ट्र प्रगतीपथावर जाते. आजचे विद्यार्थी हेच भारताचे

भावी नागरीक आहेत व ते सुसंस्कृत व्हावेत यासाठी शिक्षक हे तळमळीने ज्ञानार्जनाचे कार्य करत असतात. त्यामुळे ज्ञानदान हेच खरे दान आहे असे वक्तव्य प्रमूख पाहुणे शिवसेना तालुका प्रमुख म मुंजाभाऊ कोल्हे यांनी केले.
यावेळी शिक्षक प्रतिनिधी म्हणून गायकवाड व्ही जी, गोंगे डी बी यांनी शिक्षकांच विद्यार्थ्यांमध्ये , समाजामध्ये असणार स्थान व शिक्षकांची जबाबदारी व कर्तव्य यासंबंधी मार्गदर्शन केले.
शिक्षण प्रेमी नागरीक विठ्ठल नाना कोल्हे यांनी देखील विद्यार्थी व उपस्थितांना मार्गदर्शन केले.

अध्यक्षीय समारोप करताना जय किसान माध्य. विद्यालयाचे मुख्याध्यापक जाधव एस.के. यांनी शिक्षकांकडून असणाऱ्या समाजाच्या, विद्यार्थ्यांच्या अपेक्षा, समस्या व त्यावरील उपाय यावर सखोल मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मा. मुंजाभाऊ कोल्हे( ता. प्रमूख शिवसेना), सरपंच वसंत नाना कोल्हे, विठ्ठल नाना कोल्हे, रमेशराव बिजुले अध्यक्ष शालेय व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष विष्णू कोल्हे उपस्थित होते.
कार्यक्रमास मुख्याध्यापक सुर्यवंशी डी एस, शिक्षक गाढवे ए डी, गायकवाड व्ही जी, वायभासे बी ए, वाघ जी आर, श्रीमती गायकवाड एस ए, काळे बी एस, लांडगे एम एच, गोंगे डी बी, बिटे जी एस आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमोल कोल्हे यांनी केले तर सुत्रसंचलन कु. अश्विनी कोल्हे व कु. धनश्री कोल्हे यांनी केले
तर आभारप्रदर्शन सुरेशराव कोल्हे यांनी केले.
कार्यक्रम यशस्वितेसाठी सुरेशराव कोल्हे, अमोल कोल्हे, गोविंदराव कोल्हे, प्रकाशराव कोल्हे, विष्णू कोल्हे, सुदाम बिजुले, बालासाहेब कोल्हे ,पांडुरंग चव्हाण ,यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share now