ताज्या घडामोडीमनोरंजन

जमात ए इस्लामीच्या वतीने पर्यावरण सप्ताहाचे आयोजन

पर्यावरण सप्ताहाचे आयोजन

अंबड प्रतिनिधी :- जमात ए इस्लामी हिंद अंबड शाखेच्या वतीने पर्यावरण दिवसाचे औचित्य साधून ५ जून ते १२ जून दरम्यान पर्यावरण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.


त्या अनुषंगाने येथील नगर परिषदेचे सीईओ यांना निवेदन देऊन शहरात विविध समस्यांबाबत त्यांना माहीती देण्यात आली. यामध्ये रस्त्यांची स्वच्छता, नाल्यांची साफसफाई, कचऱ्याची व्यवस्थित विल्हेवाट लावणे, मोकाट जनावरांचा बंदोबस्त करणे,

मोकळ्या मैदानात वृक्षारोपण करणे इत्यादी सारख्या समस्यांचा उल्लेख करण्यात आला.याच सप्ताहाचा एक भाग म्हणून काल शहरातून एक रॅली काढण्यात आली. यावेळी शहरातील दुकानदार तसेच फळ विक्रेते व हात गाड्या वाल्यांच्या भेटी घेऊन त्यांना पर्यावरणाच्या रक्षणाच्या दृष्टीकोनातून महत्त्व पटवून देण्यात आले.

यामध्ये कचऱ्याचे व्यवस्थापन, कचऱ्याचे वर्गीकरण, प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळणे इत्यादी बाबींवर त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी न.प. कर्मचाऱ्यांसोबत जमातचे स्थानिक अध्यक्ष मौलाना सादेख मजाहीरी, यासीन खान, रईस टेलर, अलीम देशमुख, हकीम पटेल, शेख शब्बीर, शेख जावेद, मुजाहेद शाह, अनवर कुरेशी, तारेख शाह, शेख शारेख इत्यादी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

Share now