आम मुद्देताज्या घडामोडीमहाराष्ट्र रोखठोक

सकल मराठा समाज रस्त्यावर पाथरी बाजारपेठ बंद

प्रतिनिधी पाथरी:- आंतरवली सराटी या ठिकाणी मराठा आंदोलकांवर पोलीसांनी बळाचा वापर करत महिला,जेष्ठ नागरीक लहान मुले यांच्यावर बेछूठ लाठिमार केल्या निधार्थ शनिवार २ सप्टेबर रोजी सकल मराठा समाज मुख्य रस्त्यावर उदरत बाजार पेठ बंद करण्याचे आवाहन करून

शासन,पोलीस प्रशासना विरोधात निषेधाच्या प्रचंड घोषणा देत रस्तारोको केला या नंतर प्रशासनाला निवेदन दिले.मराठा आरक्षणाच्या प्रमुख मागणी साठी जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील अंतरवली सराटी या ठिकाणी मराठा आंदोलनाचे समन्वयक मनोज जरांगे हे मंगळवार २९ ऑगष्ट पासुन उपोषणास बसले होते.शुक्रवार १ सप्टेबर रोजी बळजबरीने पोलीस जरांगे यांना दवाखाण्यात घेऊन जात होते याला आंदोलकांनी विरोध केला.

या वेळी पोलीसांनी बळाचा वापर करून आंदोलक महिला.जेष्ठ नागरीक,युवक,बालक यांच्यावर प्रचंड लाठी हल्ला करत अश्रुधुराचे नळकांडे फोडले होते. या विषयीचे वृत्त सोशल मिडियात पसरतात मराठा समाजातुन संताप व्यक्त होत असतांना शनिवार २ सप्टेबर रोजी पाथरी तालुक्यातील सकल मराठा समाज मुख्यरस्त्यावर उतरत शहर बंदची हाक दिली.या बंदच्या हाकेला व्यापा-यांनी प्रतिसाद देत आपापली प्रतिष्ठाणे बंद ठेवली. या निषेध आंदोलनात सकल मराठा समाजाचे युवक,जेष्ठ नागरीक मोठ्या संखेने उपस्थित होते.

Share now