ताज्या घडामोडीमहाराष्ट्र रोखठोक

माजलगाव येथे राजस्थानी मंगल कार्यालयामध्ये शांतता बैठक

प्रतिनिधी फेरोज इनामदार बीड पोलीस अधीक्षक् नंदकुमार ठाकूर साहेब शांतता कमिटीच्या बैठकीस उपस्थित उपजिल्हाधिकारी नीलम बाफना मॅडम , पोलीस उपआपधीक्षक पंकज कुमार कुमावत साहेब. माजलगाव शहराचे कर्तव्यदक्ष असणारे पोलीस निरीक्षक आदरणीय श्री शितलकुमार बल्लाळ साहेब , तहसीलदार वर्षा मनाळे मॅडम , सर्व पक्षातील नेते गण गणेश मंडळाचे अध्यक्ष सचिव गणेश भक्त व्यापारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित मित्रपरिवार होता .आज माजलगाव शहरांमध्ये गणेश उत्सव निमित्त शांतता कमिटी मीटिंग संपन्न झाली. या मीटिंगमध्ये

उपस्थित असणाऱ्या गणेश मंडळाचे अध्यक्ष सचिव यांनी येणाऱ्या अडचणी काय आहेत त्या मांडल्या. या अडचणीवर सर्व पक्षातील, नेतेगण , विविध संघटनेतील पदाधिकारी , गणेश मंडळाचे अध्यक्ष सचिव गणेश भक्त यांनी सहकार्य करणार आहे असे आपल्या मनोगतातून सांगितले . याप्रसंगी मार्गदर्शन करताना पत्रकार उमेश काका मोगरेकर यांनी यांनी दोन-तीन गोष्टी महत्त्वाच्या सांगितल्या शहरांमध्ये रस्त्याचे काम चालू आहे त्या ठिकाणी रस्त्याच्या कडेला स्लोप करण्यात यावा तसेच गणेश उत्सव महालक्ष्मी , ईद-ए-मिलाद या सर्व सण उत्सवामध्ये लाईट जाणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे असे मत व्यक्त केले व सर्वात महत्त्वाचे माजलगाव शहरांमध्ये गेल्या वर्षी शहीद जवान झालेले मोरे यांना माजलगाव येथील सर्व स्तरातील नागरिकांनी मदत केली त्यामुळे माजलगाव शहरातील सर्व जाती-धर्मातील जनता सामाजिक सलोखा जपत ,

सर्व समाजातील व्यक्तीच्या सुख दुःखामध्ये असो किंवा विविध सण उत्सवामध्ये ही वेळेला उपस्थित राहून , एकत्र येऊन मदत करते असा महत्त्वपूर्ण संदेश उमेशकाका मोगरेकर यांनी उपस्थित अधिकारी गण यांना दिला. यावेळी सुहास नागलगावकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.तसेच नगरपालिकेचे डोंगरे साहेब व एम एस ई बी मधील अधिकारी यांनीही कुठलीही अडचण येणार नाही असा शब्द दिला . या प्रसंगी विविध नेते गण व पदाधिकारी यांनी देखील आपल्या मनोगतामधून सुंदर अशा आपल्या भावना व्यक्त केल्या, व सामाजिक सलोख्याचे एक दर्शन घडवले . याप्रसंगी या कार्यक्रमास प्रमुख उपस्थित असणारे बीड जिल्हा पोलीस

अधीक्षक श्री नंदकुमार ठाकूर साहेब यांनी मार्गदर्शन करताना श्री गणेशाचे वंदन करून वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभम या मंत्राने सुरुवात करून सर्व गणेश मंडळांना शुभेच्छा दिल्या व लोकमान्य टिळकांनी सर्व समाजातील सर्व जाती धर्मातील व्यक्तींना सोबत घेऊन गणेशोत्सवाची सुरुवात केली , त्यामुळे गणेशोत्सव हा एक ष्ट्रीयसण म्हणून आपण पाहिला पाहिजे , त्यामुळे सर्व समाजातील व्यक्तींनी एकत्र येऊन हा उत्सव आपण साजरी कराल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त करून मोलाचे मार्गदर्शन केले. उपजिल्हाधिकारी नीलम बाफना मॅडम म्हणाल्या गणपती विसर्जनाच्या वेळेस रात्री मिरवणूक निघताना अनेक गणेश मंडळे विविध लाईट रेडिएशन लावताना दिसतात पण त्यामुळे अनेकांच्या डोळ्याला इजा पोहोचू शकते त्यामुळे आपण अशा गोष्टीची काळजी घेणे गरजेचे आहे

असे बोलत मार्गदर्शन केले. पोलीस उपाधीक्षक पंकज कुमार कुमावत साहेब यांनी उपस्थित सर्वांना अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले . शेवटी आभार प्रदर्शन दत्ताजी महाजन यांनी केले व माजलगाव शहराला एक चांगले कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक हे भेटले आहेत असे सांगितले. त्याबद्दल माझ देखील मत आहे की पोलीस निरीक्षक श्री शितलकुमार बल्लाळ साहेब हे एक कर्तव्यदक्ष अधिकारी असून अतिशय शिस्तप्रिय अधिकारी आहेत गेल्या दोन-तीन वर्षापासून माजलगाव शहरात विविध सण उत्सव जयंती साजरी करताना सर्व समाजातील समाज बांधवांना सोबत घेऊन सामाजिक समरसता जपत अतिशय शांततेमध्ये उत्साह पूर्ण वातावरणामध्ये सन उत्सव साजरी करताना ते दिसतात. श्री शितल कुमार बल्लाळ साहेब यांनी अतिशय सर्व धर्मातील जातीतील विविध संघटनेतील सर्व व्यक्तींना सोबत घेऊन प्रत्येक सण उत्सव हे अतिशय शांततेमध्ये उत्साहा मध्येपार पाडले, याबद्दल खूप आनंद वाटतो व त्यांचे कौतुक करावेसे वाटते व सर्वात महत्त्वाचे एक उदाहरण द्यावयाचे म्हटले तर 15 ऑगस्ट रोजी त्यांनी माजलगाव शहर पोलीस स्टेशन मध्ये रक्तदान शिबिर घेतले,व ते

एक अधिकारी असताना देखील प्रथम आपण या देशाचे नागरिक आहोत व आपण समाजाच देन लागतो या भावनेतून रक्तदान शिबिर घेऊन सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले ,तसेच येणाऱ्या काळातही त्यांच्या मार्गदर्शनाखाली व सहकार्याने अशाच पद्धतीने सण उत्सव साजरी होतील अशी खात्री आहे. कारण त्यांच्या नावामध्ये शितल हा शब्द आलेला आहे त्यामुळे ते नावाप्रमाणे सर्वांना थंडपणे व शांतपणे समजून सांगतात व वेळप्रसंगी आपली शिस्त दाखवत एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून भूमिका ही बजावताना दिसतात. माजलगाव शहराला एक अतिशय अभ्यासू व्यक्तिमत्व असणारे व , सर्व जाती धर्मातील प्रथा परंपरा वेद पुराण

बायबल,कुराण अशा ग्रंथाची चांगली माहिती असणारा इतिहास प्रथा ,परंपरा यांचा अभ्यास असणारा सर्व गुण संपन्न असे अधिकारी आपल्या शहरास लाभले त्याबद्दल मनस्वी आनंद होतो. व त्यामुळेच माजलगाव शहरातील सर्वसामान्य जनतेचे त्यांच्यावर निश्चिमाचे प्रेम आहे, व त्यामुळेच येणाऱ्या काळातही विविध कार्यक्रमांमध्ये कुठलीही अडचण येणार नाही यासाठी सर्वसामान्य जनता देखील त्यांच्यासोबत राहून त्यांना सहकार्य करेल अशी खात्री आहे. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली

Share now