पाथरी येथे जमीनीच्या प्रकरणात मुख्याधिकारी निलंबित
परभणी जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी कळले नायब तहसिलदार एन. पी. वाघुडे यांच्या निलाबांचे आदेश
पाथरी येथील परभणी जिल्ह्यातील पाथरी शहरात जमीनीच्या प्रकरणात मुख्याधिकारी निलंबित तरी माहिती सविस्तर अशी आहे की परभणी जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी कळले नायब तहसिलदार एन. पी. वाघुडे यांच्या निलाबांचे आदेश मानवत तहसीलचे नायब तहसिलदार एन.पी.वाघुडे यांच्या कडे 05.10.2021 ते 11.04.2022 दरम्यान पाथरी नगर परिषद मुख्याधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार होता.
या दरम्यान 11. एप्रिल रोजी पाथरी मुख्याधिकारी म्हणून कोमल सावरे यांचे आदेश निघाल्या नंतर त्यांचा पदभार काढून घेण्यात आला होता.नायब तहसीलदार एम.पी वाघुंडे यांनी पाथरी नगर परिषद हद्दीत भूमापन क्रमांक सर्व्ह 155/1 आणि 155 /2 चे वरिष्ठ धारक असलेले शिवकुमार सदाशिव कोलपेवार रा. पाथरी आणि इतर तीन असे चार धारकांना पाथरी नगर परिषद ने 31.05.2022 मे रोजी एकूण अंशी हजार चौरस मीटर असलेल्या जमीनीचा निवासी प्रयोजनासाठी तसेच रिकामी खुले कारणास्तव क्षेत्रफळ आठ हजार चौरस मीटर आणि
25118.74.चौरस मीटर रस्त्या करता राखीव ठेऊन शर्ती अधीन राहून भूमी अभिण्यास मान्यता दिली होती. मान्यता मिळताच याठिकाणी प्लॉटिंग विक्री सुरू करण्यात आली होती. दरम्यान या प्रकरणात तत्कालीन मुख्याधिकारी एन.पी वाघुंडे यांनी त्यांच्याकडे पदभार नसताना आणि नवीन मुख्याधिकारी रुजू झाल्या असतांना त्यांनी बेकायदेशीर रित्या 31.05.2022.रोजी भूमापन क्रमांक सर्व्हे नं.155/1 आणि सर्व्हे नं. 155/2 या प्रकरणात भूमी अभिन्यासास मान्यता दिल्या बाबत जिल्हाधिकारी कार्यालय परभणी यांच्या कडे तक्रार दाखल करण्यात आली होती.
सोबतच लक्ष्मी नगर येथील प्लॉटिंग नियमबाह्य असल्याची तक्रार ही दाखल झाली होती. परभणी जिल्हाधिकारी आंचाल गोयल यांनी.जिल्हा सहआयुक्त नगर पालिका प्रशासन विभाग यांचे 03.07.2023.च्या पत्राचा संदर्भ देत या प्रकरणात मुख्याधिकारी नगर परिषद पाथरीचा पदभार नसताना नायब तहसिलदार एन.पी.वाघुंडे यांनी 31.05.2023.रोजी या अभिण्यासास मंजुरी दिल्याचे निदर्शनास आल्याने त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्यासाठी प्रस्ताव सादर केला या प्रकरणात 04.07.2023 रोजी नायब तहसिलदार एन. पी. वाघुंडे यांच्या निलंबनाचे आदेश काढण्यात आले आहेत.