मराठा आरक्षणासाठी उसळला जनसागरसकल मराठा समाजाचे शहागडला जन आक्रोश
सकल मराठा समाजाचे शहागडला जन आक्रोश
अंबड प्रतिनिधी :- तरुण मराठा युवक एकवटून आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाचे बापाचे,एक मराठा लाख मराठा,ओबीसी मध्ये सरसकट मराठा समाजाला सामिष्ट करुन आरक्षण सरकारने तत्काळ लागू करावे यासाठी जन आक्रोश आंदोलन पुकारण्यात आलेले होते, यावेळी सकल मराठा समाज बांधव हाजारोच्या संख्यांने उपस्थिती होती.यावेळी मुस्लिम समाज बांधव शहागड व मराठा स्वंयवसेवक यांनी पिण्याच्या पाण्याची व पार्किंगची व्यवस्था मोठ्या प्रमाणात केलेली होती.

राष्ट्रीय महामार्ग ५२ जवळ वाहनांच्या दुरपर्यंत रांगा लागलेल्या होत्या, पोलीस अधीक्षक राहुल खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी मुकुंद आघाव, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप एकशिंगे यांच्यासह ३०० पोलिसांसह,पोलीस कर्मचारी गृहरक्षक दलाच्या जवानांचा सहभाग होता.या आंदोलनात मोठ्या प्रमाणात लक्षणीय महिलाचा सहभागी झालेल्या होत्या.यावेळी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले हे सरकार ना करते सरकार असून वारंवार मराठा समाजाची दिशाभूल
करून,मराठा समाजाचा जिव्हाळ्याचा आरक्षणाचा प्रश्न सोडलेला नाही जो पर्यंत आरक्षण मिळत नाही तो पर्यंत पाठिमागे हटणार नाही,मराठा समाजाच्या तरुण मराठा आरक्षणासाठी बलिदान दिले,हे बलिदान व्यर्थ जाऊ नये,तरुण मराठा समाजाचे मुला मुलींना शैक्षणीक व नोकरी मध्ये आरक्षण मिळावे, आण्णासाहेब आर्थिक महामंडळ सारथी या संस्थांना सरकारने आर्थिक पाठबळ पतपुरवठा करावा, मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या तरुणांच्या घरच्यांना नोकरी व शासन मदत मिळावी,मराठा समाजाच्या अत्याचार होत असेल तर त्यांना फाशी शिक्षा होऊन,तात्काळ हा खटला फास्टट्रॅक न्यायालयात चालवण्यात यावा,जिल्ह्याच्या ठिकाणी मुली व
मुलांचे स्वतंत्र वस्तीग्रह उभारण्यात यावी, मराठा समाजाचा मुला-मुलींना शिक्षणामध्ये फिस सवलत देण्यात यांवी मराठा समाजाला प्रामुख्याने ओबीसी मध्ये समाविष्ट करण्यात यावी, शासनाने वेळोवेळी दिलेले आश्वासन पूर्ण करावेत अन्यथा, शांततेने मार्गाने मराठा समाज जन आक्रोश करीत आहे, मराठा समाजाचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही, शासनाला अल्टिमेटम देऊन मराठा समाजाला शासनाने गृहीत धरू नये, आमदार खासदार पाडण्याची ताकद मराठा समाजामध्ये आहे, आमच्या लोकप्रतिनीधीना मराठा समाजाचे काहीतरी देणे लागते या हेतूने समाजाला तात्काळ न्याय देण्यात यावा,अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली
प्रमुख मागण्याचे निवेदन उपविभागीय अधिकारी दिपक पाटील,उपविभागीय पोलिस अधिकारी मुकुंद अघाव,गोंदी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदिप एकशिंगे, तहसीलदार चंद्रकांत शेळके यांना देण्यात आले यावेळी उपविभागीय अधिकारी दिपक पाटील यांनी मराठा समाजाची समिती शासनाने स्थापन केलेले असून लवकरच या समितीचा अहवाल येणार आहे तोपर्यंत आपण सयम बाळगावा आपली मागणी तत्काळ शासन दरबारी मांडण्यात येईल. आपण आमरण उपोषण करू नये अशी कळकळीची विनंती त्यांनी मनोज जरांगे पाटील यांना केली, यावेळी सर्व ठाम पणाने जो पर्यंत आरक्षण मिळत नाही तो पर्यंत अतंरवाली सराटी अमोल उपोषण करण्यास बसणार आहे. मोठ्या प्रमाणात एकवटलेला मराठा समाजाने शहागड येथून लग्नासाठी थांब भूमिका घेतली होती परंतु मनोज रंगे पाटील यांनी समजावून सांगत आपापल्या घरी जाण्याची विनंती केली व मी आता अमरण उपोषण करणार असल्याची माहिती दिली.