Uncategorized

मुस्लीम बांधवातर्फे मंठा शहर बंदला शिवमुद्रा प्रतिष्ठाणच्या वतीने जाहीर पाठिंबा.

मंठा शहर बंदला शिवमुद्रा प्रतिष्ठाणच्या वतीने जाहीर पाठिंबा.

जालना प्रतिनिधी :- पाडुळी ता.घनसावंगी मध्ये घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ दि.८ रविवार रोजी मुस्लीम बांधवातर्फे मंठा शहर बंदला शिवमुद्रा प्रतिष्ठाण संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री उदय प्रल्हादराव बोराडे यांनी मंठा शहर बंदला पाठिंबा दिला.महाराष्ट्र ही संताची भुमी आहे.आणि प्रेषित मोहम्मद पैगंबर मुस्लीम धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबर यांच्या बद्दल पाडुळी नाईक येथील नराधम गणराज नाईक पाटील याने स्व:ताच्या फेसबुक अकाऊंट वर

अत्यंत निच शब्दाचा वापर करून फोटो पोस्ट करुन दोन समाजात तेढ निर्माण करुन दंगल घडविण्याच्या प्रयत्न केला.नराधमाने आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित करुन मोहम्मद पैगंबर यांच्या अवमान केला आहे ही बाब खेदनिय आहे त्या घटनेचा शिवमुद्रा प्रतिष्ठाणच्या वतीने जाहीर निषेध नोंदविण्यात येऊन रविवार मंठा शहर बंदला शिवमुद्रा प्रतिष्ठाणच्या वतीने जाहीर पाठिंबा दर्शविण्यात येत आहे.

Share now