महिलांची नग्न धिंड काढून बलात्कार व अत्याचार; मणिपूर सरकार बरखास्त करा,एम.आय.एम.
राष्ट्रपती शासन लागू करा -एम.आय.एम. च्या वतीने घनसावंगी तहसीलदार मार्फत राष्ट्रपतींना निवेदन
अंबड प्रतिनिधी :- मणिपूर राज्यातील दि. १९/७/२०२३ रोजी एक व्हिडिओ प्रसारित झाल्याने देशात खळबळ उडाली या व्हिडिओ मध्ये आदिवासी समाजातील महिलांची नग्न धिंड काढून त्यांच्या शरीराची विटंबना केली व त्या महिलांची गांवभर हजारोंच्या जमावाने धिंड काढून त्यानंतर त्या महिलांवर बलात्कार व अमानुषपणे अत्याचार केले. त्यामुळे भारत देशातील १४० कोटी जनतेची शरमेने मान खाली गेली.
मणिपूर राज्यातील आदिवासी समाजातील महिलांची नग्न धिंड काढून त्यांच्यावर बलात्कार व अत्याचाराच्या घडलेल्या घटनामुळे जगासमोर भारत देशाची प्रतिमा मलीन झाली.घटना घडून ७५ दिवस झाले तरी मणिपूर राज्यातील राज्य सरकारने संबंधितांवर कारवाई केली नाही.त्यामुळे राष्ट्रपती महोदयांनी मणिपूर येथील सरकार बरखास्त करून राष्ट्रपती शासन लागू करावे.व गुन्हेगारांना लवकरात लवकर पकडून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी.व
फास्ट ट्रक कोर्टात प्रकरण चालवून संबंधित आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी जालना जिल्हा एम.आय.एम. च्या वतीने घनसावंगी तहसीलदार यांच्या मार्फत राष्ट्रपतींना निवेदन देण्यात आले यावेळी निवेदन कर्ते शेख निजाम तालुका उपाध्यक्ष,रिहाण भाई पठाण,शेख उस्मान पटेल, मौलाना करीम, जावेद पटेल,बिलाल शेख,गुफरान फारुखी,शमशेरखॉ पठाण, शेख रफीक सरपंच, शेख इसाक भाई, शेख तौफिक भाई, शेख लालू भाई बहुसंख्य कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.