आम मुद्देताज्या घडामोडी

शिक्षण विभागाच्या प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षक संस्थाचालक व मुख्याध्यापक यांचा निर्णय.

पाथरी प्रतिनिधी. राज्यातील शालेय शिक्षण व उच्च शिक्षणातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रलंबीत प्रश्न सोडवणे व अन्यायकारक निर्णय स्थगित करणे या मागण्या बाबत पाथरी तालुक्यातील संस्थाचालक व मुख्याध्यापक यांनी तिन दिवस धरणे आंदोलन व २ ते ७ आँक्टोंबर असे सहा दिवस काळ्या फित लावुन निषेध करून काम करण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारी मुख्यमंत्री यांचे निवेदन नायब तहसीलदार व्हि.एस.भराडे यांनी स्विकारले आहे.


या निवेदनात गेल्या १२ वर्षापासून शाळामधील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची भरती रखडली, संच मान्यता,बिंदुनामावली प्रलंबीत आहे,कंत्राटी पध्दतीने खाजगी संस्थामार्फत शिक्षकांची भरती करण्याचे धोरण रद्द करावे,विद्यार्थी आधार व अतिरिक्त शिक्षकांबाबत वेगळे धोरण घेणे,अन्यायकारक जुना आकृतीबंध रद्द करणे, प्राथमिक शिक्षणाची जबाबदारी राज्य शासनाने योग्य रितीने सांभाळणे,शाळा दत्तक योजना रद्द करणे,थकीत वेतनेत्तर अनुदान व आरटीई अनुदान आदा करणे,पोर्टल भरती न्यायालयाचे निर्देशानुसार करणे या पार्श्वभूमीवर ३ दिवस धरणे आंदोलन व २ ते ७ ऑक्टोंबर दरम्यान काळ्या फिती लावून निषेध आंदोलनाचा निर्णय

घेतला आहे.याप्रसंगी संस्थाध्यक्ष अनिलराव नखाते,तारेख अब्दुलाखान दुर्राणी,अँड मुंजाजीराव भाले पाटील,अब्दुल हबीब अन्सारी,अब्दुल रहेमान अन्सारी, शांतीलींग काळे मुख्याध्यापक नवनाथ यादव,शाम शेळके,प्रभाकर महाजन, रमेश नखाते, शाम मचाले,प्रल्हाद शहारे,विलास पवार, रमेश सरोदे,रामेश्वर थोरवे,प्रकाश रोकडे,गोविंद केंद्रे,संजय वाशिंबे,आर.एस.वाळके यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

Share now