ताज्या घडामोडीराजकिय घडामोडी

सलीम इनामदार यांची शिवसेना शहराध्यक्ष पदी निवड

सलीम इनामदार यांची शिवसेना शहराध्यक्ष पदी निवड

परभणी : (जि.प्र.) वंदनिय हिंदुहृदयसम्राट शिवसेवा प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या आर्शीवादाने व पक्षप्रमुख महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली खा. श्रीकांत शिंदे यांच्या आदेशाने शिवसेना पक्षाच्या सलग्न अल्पसंख्याक विभागाचे परभणी शहराध्यक्ष पदी सलीम वलीयोद्दीन इनामदार यांची नियुक्ती सईद खॉन प्रदेशाध्यक्ष शिवसेना अल्पसंख्याक विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या शिफारशीने करण्यात आली असल्याची माहिती शिवसेना अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष लाल खॉ अशरफ खॉन पठाण यांनी प्रसिध्दी व नियुक्ती पत्रकाव्दारे केली आहे.

सदरील नियुक्तीपत्र देते वेळेस सईद खॉन, आसेफ खॉन, राठोड, शब्बीर बाबा, महमंद भाई, अशोक म्हेत्रे, नईम इनामदार, शेख शफी, शेख शहाबाज, सकीनाबाजी, शेख फेरोज, शेख सदाम यांची उपस्थिती होती.

या निवडीचे स्वागत मा. खा. सुरेश जाधव, मा.आ. हरिभाऊ लहाणे, मा.आ. माणिकराव अंबेगांवकर, मा. सरपंच दिंगाबार भिसे, विजय पाणबुडे, अरसला खॉन, सत्तार अन्सारी यांच्यासह अनेक मान्यवरांनी या निवडीचे स्वागत केले आहे.

Share now