चिलेखनवाडी चे माजी सरपंच संजय सावंत पाटील यांनी दोन वर्षात दामदुप्पटचे अमिष दाखवुन वसमतच्या युनुस बेग ची सहालाखाची फसवणुक
माजी सरपंच संजय सावंत पाटील यांनी दोन वर्षात दामदुप्पटचे अमिष दाखवुन वसमतच्या युनुस बेग ची सहालाखाची फसवणुक
वसमत प्रतिनिधी. वसमत शहरातील खाजीपुरा येथील रहीवासी युनुस बेग यांनी सहा लाखाची फसवणुक झाल्या बाबत शहर पोलीस स्टेशन मधे फिर्याद दाखल केली . शहरात व सर्वत्र बऱ्याचशा कंपण्याचे एंजट विविध गोड गुलाबी अमिषे दाखवत लोकांना लुटण्याचे काम करत आहेत फसवणुक झाल्याचे कळल्या नंतर बरेच जन पश्चाताप करत गप्प बसतात . यापूर्वी ही विविध कंपन्या द्वारा सामान्य लोकं अमिषाला बळी पडलेले आहेत. असाच प्रकार युनुस मुक्तार बेग यांच्या सोबत घडला आहे.
20/8/2019 मधे संजय सांवत रा .चिलेखनवाडी कुकाणा ता.जि. अहमदनगर व विजय बारसे रा. श्रीरामपुर यांनी आर. पी. नामक कंपनी मार्फत बेग यांना विश्वासात घेऊन सहा लक्ष रुपये घेऊन दोन वर्षात दामदुप्पट बारा लक्ष मिळतील असे अमिष दाखवले व वसमतकर त्या अमिषाला बळी पडले दोन वर्षा नंतर फोन मार्फत सदरील दुप्पट रक्कमे ची चौकशी केली असता फसवणुक झाल्याचे लक्ष्यात आल्यानंतर त्यांनी मुळ रक्कम सहा लक्ष रूपये परत करण्याची मागणी केली
असता संजय सांवत नामक व्यक्तीने फिर्यादी बेग यांना अश्लील भाषेत शिवीगाळ करित रूपये मागशील तर तुझ्या परिवारा सह गोळ्या घालुन खतम करून टाकेण अश्या धमक्या दिल्या बाबत व दिलेली रक्कम परत मिळवुन देण्या करिता वसमत शहर पोलीस स्टेशन कडे धाव घेतली तशा प्रकारची फिर्याद दाखल केली . सदरील प्रकरना कडे पोलीस प्रशासन चौकशी करूण काय निर्णय घेणार याकडे जनतेचे लक्ष आहे .
वसमत शहरात ऑन लाईन क्वांईन करंसी मधे बरेच नेटवर्कर वर्क करत आहेत . झटपट श्रीमंत होण्याचा शार्टकट मार्ग अवलंबुन बरेच जन कगांल होऊन कर्ज बाजारी होऊन हातचे काम सोडुन श्रीमंत झालेचे आव आनत आहेत . तरुणांनी वास्तवतेचे भान ठेवुन निर्णय घ्यावा अमिषाला बळी पडून कृपया फसवणुक करुण घेऊ नये अशी जनतेत चर्चा आहे. पत्रकार मोईन कादरी