ताज्या घडामोडीमनोरंजनमहाराष्ट्र रोखठोक

जि.प.प्र.शाळा ढालसखेडा येथे शाळा पूर्वतयारी मेळावा उत्साहात साजरा.

शाळा पूर्वतयारी मेळावा उत्साहात साजरा.

अंबड प्रतिनिधी :- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढालसखेडा येथे इयत्ता १ ली मध्ये दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचे विविध कौशल्य विकसित व्हावेत, आत्मविश्वासासह शाळेत पहिले पाऊल पडावे विद्यार्थ्यांना शाळेची, शिक्षणाची ओढ लागावी, यासाठी प्रवेश झालेल्या विद्यार्थ्यांना शाळेत बोलावून त्याचे जल्लोषात स्वागत करणे या दृष्टीकोनातून शाळा

पूर्वतयारी मेळावा क्र.२ चे आयोजन जि प प्रा शा ढालसखेडा येथे करण्यात आले.शाळेचे मुख्याध्यापक गणेश जाधव सर , नितीन रोहोकले सर , दिलीप तौर सर यांनी मेळाव्यात विद्यार्थ्यांच्या विविध कृती पूर्ण करण्यासाठी शाळेत नोंदणी , शारीरिक विकास ,बौद्धिक विकास , सामाजिक व भावनात्मक विकास , भाषा विकास ,गणन पूर्वतयारी , पालकांना मार्गदर्शन हे सात स्टॉल तयार केले. त्यात शारीरिक विकास, बौद्धिक विकास, सामाजिक विकास, भाषिक विकास विकसित व्हावे या

उद्देशाने स्टॉल लावण्यात आले. या स्टॉल वर विद्यार्थ्याची नाव नोंदणी , वजन , उंचीची नोंद घेणे , चित्राला रंग देणे , चेंडू – रिंग फेकणे , कागदाची होडी करणे, दोरी वरील उड्या मारणे , लहान- मोठा फरक ओळखणे , फळे – पक्षी यांत वर्गीकरण करणे , दिलेल्या वस्तू क्रमाने लावणे , विदयार्थ्यांनी स्वतः विषयी – कुटुंबाविषयी माहिती सांगणे ,धीटपणे बोलणे , चित्र पाहून वर्णन करणे , गोष्ट सांगणे ,

अक्षर ओळखणे , अक्षर पाहून लिहिणे , कमी – जास्त ओळखणे , आकार ओळखणे , अंक ओळखणे , वस्तू मोजणे या कृती सर्व स्टॉल वर घेण्यात आल्या या सर्व कृतींमध्ये विद्यार्थ्यांनी उत्साहात कृतियुक्त सहभाग घेतला.मेळावा क्र २ नंतर सर्व शिक्षक, पालक व बालकांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले.

इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचा शाळेत येण्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता.सदर कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष , ग्रामपंचायत ढालसखेडाचे सरपंच, योगशिक्षक गजानन पुरी सर , अंगणवाडी ताई , पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते .

Share now