जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी बारसवाडा येथील श्रीधर कुलकर्णी यांची निवड
आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी बारसवाडा
-अंबड प्रतिनिधी :- जालना जिल्हा परिषद मार्फत जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बारसवाडा केंद्र डोणगाव तालुका अंबड येथील प्राथमिक पदवीधर शिक्षक श्रीधर यशवंतराव कुलकर्णी यांची निवड झाली आहे.या निवडीबद्दल शाळा व्यवस्थापन समिती,शाळेचे मुख्याध्यापक सुभाषराव चाटे,सर्व शालेय सहकारी,बारसवाडा येथील ग्रामस्थ यांनी सत्कार करून अभिनंदन केले आहे.श्रीधर कुलकर्णी यांनी शाळा स्तरावर शासकिय रेखाकला परीक्षा, तंबाखू मुक्त शाळा अभियान,मतदार जनजागृती,चित्रकला,रांगोळी प्रदर्शन,नाणी
प्रदर्शन,प्रश्नमंजुषा,रस्ता सुरक्षा अभियान जनजागृती, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन असे नाविन्यपूर्ण उपक्रम सातत्याने राबविले. नुकतीच त्यांची महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे आयोजित व्हर्चुअल क्लासरूम साठी राज्यस्तरीय तज्ञ मार्गदर्शक म्हणून निवड झालेली आहे.तसेच जिल्हास्तरीय आदर्श मतदान केंद्रस्तरीय अधिकारी बी.एल.ओ म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे त्यांना गौरविण्यात आलेले आहे. लायन्स क्लब ऑफ जालना मर्चंट सिटी तर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार,महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित
करण्यात आले आहे.तसेच मिशन कवच कुंडल अंतर्गत कोवीड कालावधीत जनजागृतीपर नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले. अठरा वर्षाच्या कालावधीत त्यांनी हस्तपोखरी, दहिपुरी,मसई येथील जिल्हा परिषद शाळेत सेवा बजावली.खडका तालुका घनसावंगी येथील रहिवासी असणारे श्रीधर कुलकर्णी यांच्या शैक्षणिक, सामाजिक,राष्ट्रीय व सहशालेय उपक्रमांची दखल घेऊन या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.या निवडीबद्दल डोणगावचे केंद्रप्रमुख रामेश्वर आंबटकर,शाळेचे मुख्याध्यापक सुभाषराव चाटे,शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष राधाकिसन सावंत,माजी सरपंच किसनराव गायकवाड,पोलिस पाटील जगन्नाथ माळकरी,विष्णू
पवार,भानुदास भोळे,सुभाषराव मिठे,आबासाहेब शिंदे, गजानन मिठे यांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या आहेत.या निवडीबद्दल अंबडचे गटशिक्षणाधिकारी गोविंद चव्हाण,सरपंच रामेश्वर खंडागळे,उपसरपंच गजानन सावंत,नारायण घाडगे,अर्जुन खोंडे, संतोष सावंत,गोकुळ बोबलट,लहू गोल्हार,सुरेखा जाधव, लताबाई मुळे,सर्व विद्यार्थी,डोणगाव केंद्रांतर्गत मुख्याध्यापक,शिक्षक यांनी अभिनंदन केले आहे.या निवडीबद्दल श्रीधर कुलकर्णी यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.