ताज्या घडामोडीमहाराष्ट्र रोखठोक

मातंग एकता आंदोलन राज्य व्यापी संघटनेच्या जालना जिल्हा संघटक पदी सुनिल काळुंके यांची निवड.

जालना जिल्हा संघटक पदी सुनिल काळुंके यांची निवड.

जालना प्रतिनिधी :- मातंग एकता आंदोलन या राज्य व्यापी संघटनेच्या वतीने जालना जिल्हा स्तरीय बैठक संपन्न झाली.या बैठकी मध्ये सामाजिक उपक्रम राबविण्याचे ठरविले आहे.यामध्ये गायरान परिषद मातंग अ ब क ड आरक्षण अशा अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली.

यावेळी मातंग एकता आंदोलन या राज्य व्यापी संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष शिवाजीदादा घुले, जालना जिल्हा अध्यक्ष राजु जाधव, यांच्या हस्ते मातंग समाजाचे अभ्यासु व जुने कार्यकर्ते सुनिल काळुंके यांची जालना जिल्हा संघटक पदी निवड करण्यात आली.

यावेळी जिल्हा उपाध्यक्ष सुनिल डोईफोडे, जिल्हा उपाध्यक्ष साळीकराम बाळसराफ, जिल्हा कार्यअध्यक्ष दानियेल निरमळ, जिल्हा सरचिटणीस भिवराज सकट,अंबड तालुकाध्यक्ष सुनिल लालझरे,युवा तालुकाध्यक्ष सुकदेव सोनवू,भाटेपुरी विभाग प्रमुख सुकदेव डोईफोडे,रुईचे माजी सरपंच ज्ञानदेव पिसोळे, गोकुळ शेळके,सुभाष लालझरे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मारियाताई बाळसराफ तसेच बहुसंख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

Share now