डॉक्टर साबळे यांचे निलंबन रद्द करण्याच्या मागणीसाठी संघर्ष मजूर क्रांती संघटनेचा भव्य मोर्चा
शेख सादेक यांनी शेकडो महिलांसह तहसिलवर धडकवला मोर्चा
माजलगाव प्रतिनिधी.बीड जिल्हा रुग्णालयाचे शल्य चिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांचे निलंबन मागे घेण्याच्या मागणीसाठी संघर्ष क्रांती मजूर संघटनेच्या वतीने शेख सादेक यांच्या नेतृत्वाखाली माजलगाव तहसीलवर शेकडो महिला सह भव्य मोर्चा काढण्यात आला यावेळी तहसीलदार वर्षा मनाळे यांना निवेदन दिले.
कर्मचारी भरतीमध्ये डॉ. सुरेश साबळे यांचा काडीमात्र सबंध नसतांना त्या गैर कारभारामध्ये डॉ. साबळे यांना अडकविण्याचा प्रयत्न केला असून या कारवाईच्या विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. जिल्ह्यातील लोखंडी सावरगांव या ठिकाणी झालेल्या भरतीमध्ये मोठा गैरप्रकार झाल्याचा प्रश्न अधिवेशनामध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांनी
मांडल्यावर याची सखोल चौकशी करुन नंतर दोषी आढळल्यास निलंबन करणे अपेक्षित होते. परंतु तसे न होता आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी तडकाफडकी निलंबनाची घोषणा केली. विशेष म्हणजे लोखंडी सावरगांव या ठिकाणी झालेल्या भरती घोटाळ्यामध्ये डॉ. सुरेश साबळे यांचा काडीमात्रही सबंध नाही. विशेष म्हणजे ही भरती एका कंपनी ने केली असुन सर्व प्रक्रिया याच कंपनीने राबविले आहे. त्यामुळे यात काही गैरप्रकार झाला असेल तर
या कंपनीविरुद्ध गुन्हे दाखल करणे अपेक्षित असतांनासुध्दा गैरकारभार अधिकाऱ्यांच्या माथी मारला गेला असून हे निलंबन रद्द करण्यात यावे अशी मागणी करत संघर्ष मजूर क्रांती संघटने अध्यक्ष शेख सादिक यांनी शेकडो महिला सोबत घेऊन भव्य असा मोर्चा शहरातील जुना मोंढा ते आंबेडकर चौक शिवाजी महाराज चौक मार्गे तहसीलवर धडकला यावेळी मागण्याचे निवेदन तहसीलदार वर्ष मनाळे यांना देण्यात आले या मोर्चा शेकडो मजूर कामगार महिला सहभागी होत्या.