जैन मुनी आचार्य श्री १०८ कामकुमार नंदी महाराज यांच्या अमानुष निर्मम हत्येच्या निषेधार्थ अंबड येथे मूक मोर्चा.
जैन मुनी आचार्य श्री १०८ कामकुमार नंदी महाराज यांच्या अमानुष निर्मम हत्येच्या निषेधार्थ अंबड येथे मूक मोर्चा.
अंबड प्रतिनिधी :- रायबाग, चिक्कोडी : तालुक्यातील हिरेकुडी येथील नंदीपर्वत आश्रमात जैन मुनी आचार्य श्री १०८ कामकुमार नंदी महाराज यांची निर्घृण हत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी दोघां नराधमांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.या नराधमांनी मठातच मुनींची हत्या करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेहाचे तुकडे करून रायबाग तालुक्यातील कटकभावी येथे शेतातील कूपनलिकेत टाकले होते.
या निर्मम हत्येच्या निषेधार्थ अंबड तालुक्यातील सकल जैन समाजाच्या वतीने मूक मोर्चा काढून तहसीलदार चंद्रकांत शेळके यांना निवेदन देण्यात आले.या अमानुष हत्तेच्या निषेधार्थ संपूर्ण देशभर जैन समाजाने मोर्चा चे आयोजन केले आहे. आज दि.१४ शुक्रवार रोजी १००८ भगवान महावीर मंदिरापासून सकल जैन समाज एकत्रित येऊन हा मूक मोर्चा मार्गक्रमण करत स्वामी मठ मार्गे,नाथेकर चौक,गणपती गल्ली,
महाराष्ट्र द्वार, भगवान महावीर चौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, बस स्थानक मार्गे तहसील कार्यालयात पोहोचला यादरम्यान मूक मोर्चात निषेध फलक झळकत होते,साधू संतो के सन्मान में जैन समाज मैदान मे,ना समजो यह मजबूरी है फाशी होना जरुरी है,गुरु हमारे प्राण है जैन धर्म की शान है, साधू संताला पोलीस संरक्षण मिळालेच पाहिजे, आदी स्लोगन सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. अहिंसा प्रेमी व शांत प्रिय असलेल्या या समाजावर फार मोठा आघात झालेला आहे
व निरंतर होत आहे. वेळोवेळी अत्याचार होत असलेल्या सकल जैन समाजाच्या आस्थेचा व अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. भविष्यात अशा अमानवीय घटना घडू नये म्हणून सकल जैन समाजातर्फे महाराष्ट्र,कर्नाटक सह भारत सरकारला काही प्रमुख मागण्या करीत आहेत यात आरोपीस फास्टट्रॅक द्वारे त्वरित कारवाई, जैन साधू साध्वींना प्रवासात पोलीस संरक्षण,जैन साधू साध्वींना सरकार मान्य शाळा महाविद्यालयात विश्रामासाठी व आहारासाठी व्यवस्था करावी या प्रकारचे परिपत्रकच काढावे असेही निवेदनात म्हटले आहे.शेवटी सदर घटनेचा तीव्र शब्दात निषेध करून आरोपींना तात्काळ फास्टट्रॅक न्यायालयाद्वारे निकाल लावून कठोर शासन करावे अशी मागणी सकल जैन समाजाच्या निवेदनात केली आहे.