ईदगा मोहल्ला मध्ये रस्ते नालीचे काम लवकरात लवकर चालू करा
ईदगा मोहल्ला मध्ये रस्ते नालीचे काम लवकरात लवकर चालू करण्यात यावे. एम.आय.एम नेते. गुड्डू खातीब
माजलगाव प्रतिनिधी फेरोज इनामदार माजलगाव शहरातील प्रभाग क्रमांक. 4. क्र मध्ये ईदगा मोहल्ला येथे मागील 15 ते 16 वर्षापासून रस्ते व नालीचे काम झालेले नाही व बरेच वर्षापासून या भागातील नालीचे काम झालेले नाही व नाली आज पर्यंत बांधण्यात आलेली नाही तसेच ईदगा मोहल्ला40 ते 50 वर्षापासून वसलेला असून या ठिकाणी पिण्याचे पाण्याची पाईपलाईन नाही. माजलगाव शहरामध्ये नगरपरिषद प्रशासनाद्वारे मोठ्या प्रमाणात
विकास कामे चालू आहेत. तसेच प्रभाग क्र.4. वार्डामध्ये ही 80 टक्के या परिसरात वेळोवेळी विकास कामे झालेली आहे. काही ठिकाणी रस्ते व नालीचे काम चालू आहे. पण ईदगा मोहल्ला एकमात्र असा मोहल्ला आहे की, या ठिकाणी मागील 15 ते 16 वर्षापासून कसल्याही प्रकारची वार्डती नगरसेवक व नगरपालिका प्रशासनाद्वारे रस्ते व नालीचे व पिण्याचे पाणीचे पाईपलाईनचे काम व इतर मूलभूत सुविधा उपलब्ध नाहीत. या करिता
माननीय मुख्याधिकारी साहेबांना निवेदन देण्यात आले की आपण वैयक्तिक सहानुभूती पूर्वक लक्ष देऊन प्रभाग क्रमांक.4. ईदगा मोहल्ला रस्ते व नालीचे काम लवकरात लवकर चालू करण्यात यावे नसता आपल्या नगरपरिषद कार्यालयावर दिनांक 27/09/2023. रोजी सकाळी 11. वाजता बोंबमारो आंदोलन लोकशाही मार्गाने करण्यात येईल याची दखल घ्यावी या करिता निवेदन देण्यात आले. निवेदन देताना. एम.आय. एम. नेते गुड्डू खतीब. हाजी अंसार खान , शेख दस्तगीर वस्ताद,सागर भैय्या, शेख निज़ाम सैय्यद निसार ,सय्यद वसीम, शेख तनवीर अहमद होते