आम मुद्देताज्या घडामोडी

शेतकऱ्यांनी आर्थीक प्रगतीसाठी रेशीम उद्योगाकडे वळावे.


हादगाव खुर्द येथील कार्यक्रमात बाजार समितीचे सभापती अनिलराव नखाते यांचे प्रतिपादन.

पाथरी प्रतिनिधी. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतीची आवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे तर दुसरीकडं रेशीम उद्योगात रेशीम अंडीचा तुटवडा भरून काढण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू असल्याने या व्यवसायाला खूप संधी निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांनी आर्थिक प्रगती साधण्यासाठी पारंपरिक शेती करण्याबरोबर रेशीम उद्योगाकडे वळावे असे

प्रतिपादन पाथरी बाजार समितीचे सभापती अनिलराव नखाते यांनी केले आहे.पाथरी तालुक्यातील हादगाव येथे १८ जानेवारी रोजी ग्रामपंचायत सभागृहात आत्मा, कृषि विभाग, रेशीम संशोधन योजना, वनामकृवि, व जिल्हा रेशीम कार्यालय परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित प्रौढ रेशीम किटक संगोपन प्रात्यक्षिक व प्रशिक्षण कार्यक्रमात अध्यक्षीय समारोप प्रसंगी पाथरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अनिलराव नखाते बोलत होते.

याप्रसंगी मार्गदर्शक म्हणून लिड बँकेचे व्यवस्थापक सुनिल हट्टेकर,कृषि विद्यापीठातील रेशीम संशोधन योजनेचे डॉ. चंद्रकांत लटपटे, डॉ. संजोग बोकन व जिल्हा रेशीम कार्यालय परभणीचे एम.एल. आगम हे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच बिभीषण नखाते,तालुका कृषी अधिकारी गोविंद कोल्हे,मंडळ कृषी अधिकारी गोपाळ ढगे यांची उपस्थिती होती.पुढे बोलतांना अनिलराव नखाते म्हणाले की, गावातील शेतक-यांनी समुह पध्दतीने रेशीम उद्योग करण्यासाठी पुढे यावे व शेतीपूरक दुग्ध व्यवसायही करावा.यासाठी त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी मि सदैव कटिबद्ध आहे

असे सांगितले.यावेळी रेशीम शेती व शासकिय योजना बाबत एम.एल. आगम यांनी शेतक-यांना सविस्तर मार्गदर्शन केले.तर तुती रोपांची लागवड व तुती कांडी न लावता रोपांचीच लागवडीबाबत ची पध्दत डॉ. सी.बी. लटपटे यांनी सांगीतली. उझी माशी नियंत्रणासाठी निसंलायनेक्स थायमस या परोपजिवी किटकाचे महत्व सांगुन एन टी पाऊच रेशीम संशोधन योजना, वनामकृवि परभणी येथे उपलब्ध असल्याचे संजोग बांकन यांनी सांगीतले तर सुनिल हट्टेकर. पिक कर्ज व सिल्क आणि मिल्कची सविस्तर

दिली.सूत्रसंचालन डॉ. संजोग बोकन यांनी केले. विशाल दलाल यांनी अभार मानले,यावेळी परिसरातील ८० पेक्षा अधिक शेतकरी उपस्थीत होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी चंद्रशेखर नखाते,बाबासाहेब नखाते, सागर मिसाळ,मंगरूळ येथील प्रगतशील शेतकरी मोहन कापसे, गुलाब जडे,अशोक नाईकनवरे गावातील रेशीम उद्योजक शेतकयांनी परिश्रम घेतले.

Share now