माजलगाव तहसील पुरवठा विभागाच्या भोंगळ गैर कारभार विरोधात सामान्य जनतेची पिळवणूक थांबवा। नवीद सिद्दीकी
माजलगाव प्रतिनिधी फेरोज.26 सप्टेंबर रोजी उप उभागीय अधिकारी यांना निवेदन द्वारे येत्या 25 02/10/2023 या रोजी एम आय एम युवा नेते तथा महाराष्ट्र राज्य बांधकामगार सेना संघटना तालुका अध्यक्ष नावेद सिद्दिकी यांनी निवेदन द्वारे बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे
निवेदनात म्हटले आहे की सध्या माजलगाव शहरातील 307 स्वस्त राशन दुकान धारक बरेच दिवसापासून गोरगरीब दिन दळीत कष्ट काम करणारे
दुर्बल घटकाचे लोकांची जाणून बुजून पिळवणूक करीत आहे यावर माजलगाव तहसील पुरवठा विभागाचा दुर्लक्ष दिसून येत आहे दर महिन्याला राशन धारकांना राशन भेटत नसल्यामुळे गरीब राशन धारक व जनता वैतागून गेली आहे कोणतेही वेळेचा फलक न लावता वेळी चा पालन न करता जनतेची व शासनाची दिशा भूल करून जनतेला जाणून बुजून नाहक त्रास देण्याचा काम हे स्वस्त राशन दुकानदार करीत आहे इतकाच नाही तर त्यांना वारंवार चक्रा मारावे लागत आहे एजंटामार्फत राशन दुकान चालवितात जर राशन दुकानदाराला कोणी काही म्हणला तर ते म्हणतात जा काय करायचा
करा तुम्हाला मी राशन देत नाही म्हणून गोरगरीब दिन दलितकष्ट काम करणारे दुर्बल लोकांची व गरीब जनतेची पिळवणूक करीत आहे माजलगावचे या सर्व सामान्य गोरगरीब दिन दळीत कष्ट काम करणारे जनतेस न्याय मिळवून देण्यासाठी माजलगाव तहसीलदार साहेबांनी व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यावर स्वतः लक्ष देऊन जनतेला वाढ निहाय राशन दुकान देऊन न्याय मिळवून द्यावे
असे निवेदन द्वारे नाविद सिद्दिकी यांनी दिला आहे