ताज्या घडामोडी

प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर (स.अ.) यांची विटंबना करणाऱ्यांवर कठोर कारवाई व नुरुल हसन जस्टिससाठी आंदोलन

माजलगाव एमआयएम तर्फे चौकात निदर्शने
माजलगाव-प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर विषयी सोशन मीडीया मध्ये अवशब्द वापरणारे समाजकंटकांवर कडक कारवाई करा व मौजे पुसीसावली जि. सातारा मधील समाजकंटकानी मुस्लीम समुदायावर हमला केला त्यात एक व्यक्ती मृत्यु नुरुल हसन मरण पावला व 15 जण जख्मी झालेले

आहे.मृत व्यक्ती नुरुल हसन यांच्या कुटुंबातील एक सदस्यला शासकीय नोकरी देण्यात यावे व 15 जख्मी व्यक्तींना व नुकसानग्रस्तांना तात्काळ आर्थिक मदत दया व अन्य प्रमुख मागण्यासहित माजलगाव एमआयएम पक्षातर्फे डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात एमआयएम जिल्हाध्यक्ष अँड शफिक भाऊ यांच्या आदेशानुसार शहराध्यक्ष शेख रशिद, तालुकाध्यक्ष इद्रिस पाशा शेख यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली.


घनसांगवी जि. जालना येथे एका समाजकटकाने प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांच्या विषयी सोशन मिडीयावर अपशब्द वापरून दोन समाजमध्ये तेढा निर्माण करण्यात आले. ह्या समाजकंटकावर अटक करण्यात आलेली आहे पण अश्या घटना दैनंदीन वाढविण्यात येत असुन त्या समाजकंटकावर कठोर कार्यवाही करावे तसेच मौजे पुसीसावली जि. सातारा एक महिण्यापुर्वी काही समाजकंटकांनी मुस्लीम समुदायांवर हमला केला त्यात युवक नुल हसन नामाचे व्यक्ती जागेवर मरण पावला व 15 व्यक्तींना जख्मी करण्यात आलेले आहे. AIMIM पक्षातर्फे पुर्ण महाराष्ट्रात अश्या घटनांवर कारवाई

करण्यासाठी कडक पावले उचलावे व मौजे पुसीसावली जि. सातारा मधील घटनेच्या निषेधार्थ एमआयएम पक्षातर्फे संपूर्ण महाराष्ट्र धरणे आंदोलन, निदर्शने करण्यात आले त्यातील प्रमुख मागण्या -१) निष्काळजीपणा करणाऱ्या संबंधीत पोलिस अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करणे.२ )मृत नुरूल हसन यांच्या कुटूंबीयांना 1 कोटी रुपये आर्थिक मदत करण्यात यावी.
३)हसन यांच्या कुटूंबातील एका व्यक्तीला शासकीय नोकरी देण्यात यावे.४) १५जख्मी व नुकसानग्राल व्यक्तींना प्रत्येकी 1 लाख रुपयाची आर्थीक मदत करण्यात यावे.


५)दंगलीचा सुप्रधार भाजप प्रदेश उपाधयक्ष विक्रम पावसकर याची चौकशी करूण कार्यवाही करा अश्या प्रमुख मागणी तात्काळ मान्य करून कार्यवाही करावे हयासाठी आज दि. 10/10/2023 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडक चौकात माजलगांव एमआयएम पक्षातर्फे निदर्शने करण्यात आले ह्यावेळी तालुकाध्यक्ष इद्रिस पाशा शहराध्यक्ष शेख रशीद शेख,हाफेज फारुख,अन्सर शेख,हाफेज फारुख,सिध्दिक शेख,समीर शेख, सोहेल अत्तार, नावेद सिद्दीकी, गुड्डू खतिब, मजहर शेख, फारुख अत्तार, उमर पटेल,अजहर शेख,राजु शेख,साहेल चाऊस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते

Share now