आम मुद्देताज्या घडामोडी

ऊस तोड कामगारांनी १५. ऑगस्ट पर्यंत नोंदणी करुन घ्यावी.

ऊस तोड कामगारांनी १५. ऑगस्ट पर्यंत नोंदणी करुन घ्यावी. जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे यांचे आहवान

बिड जिल्हा प्रतिनिधी.ऊसतोड कामगारांची नोंदणी १५ ऑगस्ट २०२३ पर्यंत पुर्ण करण्याचे जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे यांचे आवाहनशासन निर्णय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग दिनांक २१सप्टेंबर २०२१अन्वये राज्यातील ऊसतोड कामागार ज्या ठिकाणी वास्तव्याला आहे व जे सतत मागील तीन वर्षापासुन ऊसतोडणी करीत आहेत अशा ऊसतोड कामगारांची ग्रामसेवकाने (संबंधीत गावातील, वस्त्यांमधील,

पाडयांमधील व इतर ) सर्वेक्षण करुन नोंदणी करावी असे निर्देश दिलेले आहेत.त्याअनुषंगाने बीड जिल्हा परिषदेमार्फत ऑनलाईन वेबसाईट (https://zpedms.com) तयार केलेली असुन याव्दारे ३७६३४ ऊसतोड कामगारांची नोंदणी करण्यात आलेली आहे.दिनांक.०६जुलै रोजीच्या बैठकीमध्ये. जिल्हाधिकारी, बीड यांनी सर्व ऊसतोड कामगार यांनी १५ ऑगस्ट २०२३ पर्यंत नोंदणी करण्याचे निर्देश दिलेले आहेत.गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनाचे.लाभ घेण्यासाठी ऊसतोड कामगार नोंदणी असणे आवश्यक आहे तरी सर्व ऊसतोड कामगार यांनी १५.ऑगस्ट.२०२३ पर्यंत नोंदणी करावी असे आवाहन जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे यांनी केले आहे.

Share now