आम मुद्देताज्या घडामोडीमहाराष्ट्र रोखठोक

अंबड न.प.मुख्याधिकाऱ्याकडून सर्व्हे नं.३९ मधील अतिक्रमण धारकांची पाठराखण

अंबड प्रतिनिधी :- जालना-अंबड रोडवरील सर्व्हे नं.३९ मध्ये काही धनदांडग्या आर्थिक बाजुने सक्षम असलेल्या लोकांनी खुल्या जागेवर मुख्याधिकारी विक्रम मांडूरके यांच्या आर्शिवादाने जालना-अंबड रोड लगत सर्व्हे नंबर ३९ मधील खुल्या जागेवर अतिक्रमण केले आहे.

नगर परिषद अंतर्गत सर्व्हे नंबर ३९ मधील खुल्या जागेवर झालेले अतिक्रमण काढण्या संदर्भात लहुजी साळवे बहुजन क्रांती सेनेच्या वतीने तक्रार अर्ज देऊन पाच दिवस चाललेल्या आमरण उपोषण मध्ये मुख्याधिकारी विक्रम मांडूरके यांनी उपोषणस्थळी उपोषण कर्त्यास आम्ही १५ दिवसात अतिक्रमण धारकांवर कार्यवाही करु असे लेखी स्वरुपाचे पत्र दिले

त्यांच्या लेखी दिलेल्या पत्रामुळे उपोषण सोडले उपोषण सोडल्यापासून आजपर्यंत सर्व्हे नंबर ३९ मधील अतिक्रमण धारकांवर कसल्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही तसेच त्यांना साधी नोटीस सुध्दा देण्यात आली नाही.मुख्याधिकारी विक्रम मांडूरके यांनी अतिक्रमण धारकांकडून काही आर्थिक देवाण घेवाण करुन प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करीत असल्याचं अंदाज आहे.

अतिक्रमण धारक व मुख्याधिकारी विक्रम मांडूरके यांची मिलीभगत चर्चा सुरू असून अतिक्रमण धारकांना वाचवण्याचे काम व अतिक्रमण काढण्यास टाळाटाळ करीत आहेत. मुख्याधिकारी विक्रम मांडूरके कसल्याही प्रकारची कारवाई न करता अतिक्रमण धारकांची पाठराखण करीत आहेत.

Share now