ताज्या घडामोडीमहाराष्ट्र रोखठोक

अंबड नगर परिषदेचे मुख्यधिकारी विक्रम मांडुरंके यांना निलंबित करा. सय्यद अय्युब बागवान.-

मुख्यधिकारी विक्रम मांडुरंके यांना निलंबित करा – सय्यद अय्युब बागवान.-

अंबड प्रतिनिधी :- अंबड नगर परिषदेचे तात्कालीन मुख्याधिकारी विक्रम मांडुरंके यांनी अंबड नगर परिषद मालकीच्या जंगी तलाव मासेमारीचा सहा महिन्याचा मक्ता १८ लक्ष ९६०००हजार रुपये मध्ये दिला होता त्यानंतर एका वर्षाची निविदा प्रसिद्ध करून शासकीय बोली ४१ लक्ष ७१ हजार २०० रुपये ठेवली आणी कहर म्हणजे ती निविदा रद्द करून नव्याने २ वर्षाची लिलाव सूचना प्रसिद्ध केली व त्यात शासकीय बोली साडे चार लाख रु ठेऊन सदर निविदा मॅनेज करून केवळ ४ लाख ५७ हजार रुपयांमध्ये संबंधितास मासेमारी मक्ता देऊनच टाकला.

यामध्ये स्वतःच्या आर्थिक हितासाठी त्यांनी शासनाचा लाखो रुपयाचा महसूल बुडवला आहेआशी तक्रार शहरातील सामाजिक कार्यकर्ते श्री अय्युब बागवान यांनी केली.या संदर्भात विभागीय आयुक्त यांना दिलेल्या तक्रारीत अय्युब बागवान यांनी म्हटले आहे कि सन २०२२-२३ या आर्थिक वर्षातील ३१ मार्च २०२३ पर्यंत ६ महिन्याकरिता १८ लक्ष ९६ हजार रुपया मध्ये अंबड नगर परिषद मालकीचा जंगी तलाव मासेमारी मक्ता सैफान वहाबुद्दीन फारुकी यांना दिल्याचे १५ सप्टेंबर २०२२ रोजी प्राधिकार पत्र देण्यात आले.त्यांनी ६ महिन्याचा कार्यकाळ संपल्यावर मुख्याधिकारी विक्रम मांडुरंके यांनी दिनांक १६ मार्च २०१३ रोजी एका वर्षाची जाहीर ई लिलावं निविदा सूचना

प्रसिद्ध करून त्यात शासकीय बोली ४१ लाख ७१ हजार २०० रुपये ठेवण्यात आली होती त्यानंतर मात्र मुख्याधिकारी विक्रम मांडुरंके यांनी स्वतःच्या आर्थिक हितासाठी १६ मार्च २०२३ रोजी प्रसिद्ध केलेली लिलावं सूचना रद्द करून नव्याने २ वर्षाकारिता लिलावं सूचना प्रसिद्ध केली व त्यामध्ये शासकीय बोली साडे चार लाख ठेवण्यात आली.सदर निविदा मॅनेज करून जंगी तलाव मासेमारी मक्ता ४ लाख ५७ हजार रुपयेमध्ये देऊन त्यानी शासनाचा मोठया प्रमाणात आर्थिक महसूल बुडवाल्याचे दिसून येत आहेसदरील टेंडर संबंधित ठेकेदारास मॅनेज करून देऊन त्यानी लाखो रुपयाचा आर्थिक भ्रष्टाचार केल्याचं दिसून येत आहेत्यामुळं त्यांना तात्काळ निलंबित करून सदरील टेंडर रद्द करण्यात यावे त्याचप्रमाणे तत्यांच्या काळात झालेल्या निर्णयाची खातेनिहाय चौकशी करण्यात यावे आशी मागणी अय्युब बागवान यांनी निवेदनात केली-

अन्यथा १५ ऑगस्टाला उपोषण करणार -अय्युब बागवानअंबड नगर परिषडेच्या तत्कालीन मुख्याधिकारी विक्रम मांडुरंके यांनी त्यांच्या कार्यकाळात जंगी तलाव मासेमारी मक्ता, भाजी मंडी मक्ता व आठवडी बाजार मक्तामध्ये अनियमितता केलेली आसून सदरील मक्ता संबंधित ठेकेदारास टेंडर मॅनेज करून देत शासनाचा मोठया प्रमाणात आर्थिक महसूल बुडवला आहेतसेच त्यांच्या विरोधात भ्रष्टाचाराची तक्रार दाखल होताच त्यांनी काही दिवसात स्वतःची बदली करून घेत केलेल्या भ्रष्टाचारावर पांघरून घालण्याचे काम केले असल्याचे सांगताच दि १४ आगस्ट २०२३ पर्यंत तात्कालीन मुख्याधिकारी विक्रम मांडुरंके यांच्यावर काहीच कार्यवाही न झाल्यास दि.१५ ऑगस्ट रोजी आपल्या कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल असा इशारा सय्यद अय्युब बागवान यांनी दिला आहे.

Share now