खरीप हंगामाची ई-पीक पाहणी १००टक्के विविध घटकांनी सहभाग नोंदवावा. तहसीलदार चंद्रकांत शेळके
खरीप हंगामाची ई-पीक पाहणी १००टक्के विविध घटकांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी केले.
अंबड प्रतिनिधी :- तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी तलाठ्याकडे न जाता मोबाईल ॲपच्या साह्याने स्वतःच्या मोबाईलवरुन आपल्या ७/१२ वर विविध पिकांची नोंदणी करता येणे शक्य झाले आहे.महसूल विभागाचा ई-पीक पाहणी प्रकल्प १५ ऑगस्ट २०२१ पासून राज्यभर राबविण्यात येत आहे.या ई-पीक पाहणी ॲपच्या माध्यमातून
मागील रब्बी हंगामामध्ये तालुक्यातील शेतकऱ्यांनी १०० टक्के ई-पीक पाहणी करून आपल्या पीकाची नोंदणी करुन शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेतला आहे.त्यामुळे सद्यस्थितीत सुरू असलेल्या खरीप हंगामाची ई-पीक पाहणी देखील आपल्याला १०० टक्के पुर्ण करावयाची आहे.असे आवाहन तहसीलदार चंद्रकांत शेळके,अपर तहसीलदार ऋतुजा पाटील, तालुका कृषी अधिकारी सचिन गिरी यांनी केले आहे.खरीप हंगाम २०२३ पीक पाहणी नोंदणीसाठी ई-पीक पाहणीचे २.०.११ हे अपडेटेड व्हर्जन गूगल प्ले स्टोअर वर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.
तरी सर्व खातेदार शेतकऱ्यांनी नवीन व्हर्जन अपडेट करुन घेणे आवश्यक आहे.खरीप हंगामाच्या प्रत्यक्ष ई-पीक पाहणी मोबाईल ॲपद्वारे पीक पाहणी करण्यासाठी ०१ जुलै २०२३ पासून सुरू करण्यात आलेली आहे.तालुक्यातील सर्व मंडळातील शेतकरी बंधु-भगिनी, गावातील सरपंच, पोलीस पाटील,तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक, कोतवाल, स्वस्त धान्य दुकानदार, महात्मा गांधी तंटामुक्ती अध्यक्ष, बचतगट, प्रतिनिधी, सहकारी संस्थाचे अध्यक्ष व सचिव, अध्यक्ष-शेतकरी दुध उत्पादक संघ,पाणी फाउंडेशन गट,पोकरा प्रतिनिधी, ग्रामरोजगार सेवक,
तांत्रीक सहाय्यक, बॅक प्रतिनिधी,शाळा व कॉलेज विद्यार्थी, प्रगतशील शेतकरी, सर्व ग्रामपंचायत समिती, पंचायत समिती व जिल्हा परिषदेचे सदस्य, मिडिया प्रतिनिधी,आपले सरकार सेवा केंद्र चालक यांनी देखील शासनाच्या महत्वाकांक्षी असलेल्या ई-पीक पाहणी प्रकल्पात सहभाग घेऊन शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी करण्यासाठी प्रोत्साहित करावे असे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी म्हटले.तसेच शेतकरी बंधु-भगिनींना आवाहन करण्यात येते की त्यांनी खरीप हंगाम २०२३ साठी दिलेल्या कालावधीमध्ये आपली ई-पीक पाहणी नोंदणी पुर्ण करावी जेणे करून शासनाच्या विविध योजना पिक विमा,पिक कर्ज, शासकीय अनुदान ईतर विवीध योजनांचा लाभ घेण्यास मदत होईल.तसेच खरीप हंगामाची ई-पीक पाहणी १०० टक्के पुर्ण करण्यासाठी विविध घटकांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन ही तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी केले आहे.