आम मुद्देताज्या घडामोडीमहाराष्ट्र रोखठोक

मानवत तालुक्यातील सकल मराठा समाजाचा जरांगे पाटील यांच्या उपोषणास पाठींबा

सकल मराठा समाजाचा जरांगे पाटील यांच्या उपोषणास पाठींबा

मानवत प्रतिनिधी. गोविंद घांडगे यांच्या शिष्टमंडळाने अंतरवाली येथे जाऊन आंदोलकाची घेतली भेटमानवत : देशोन्नती वृत्तसंकलनजालना जिल्ह्यातील अंतरवाली ( सराटे ) येथे आरक्षणाच्या मागणीसाठी मागील आठ दिवसापासून मनोज जरांगे पाटील यांच्यासह अनेक समाज बांधव उपोषणास बसले आहेत शुक्रवारी उपोषणार्थी व ग्रामस्थांवर जालना पोलिसांनी लाठीमार करून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला या घटनेचा मानवत तालुका सकल मराठा समाजाच्यावतीने जाहीर निषेध करण्यात

आला असून गोविंद घांडगे यांच्या शिष्टमंडळाने अंतरवाली येथे जाऊन या उपोषणास जाहीर पाठिंबा दिला आहेजालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील अंतरवाली ( सराटे ) येथील मनोज जरांगे पाटील यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी आरक्षणाच्या मागणीसाठी शांततेत उपोषण सुरू केले होते परंतु जालना पोलिसांनी आंदोलन कर्त्यावर अमानुषपणे लाठीचार्ज करत हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला यामध्ये अनेक महिला, नागरिक व तरुण जखमी झाले आहेत त्यामुळे या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी रविवार ३ सप्टेंबर रोजी मानवत तालुक्यातील गोविंद घांडगे यांच्या नेतृत्वाखाली सकल मराठा समाजाचे शिष्टमंडळ जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील अंतरवाली

येथील उपोषणस्थळी जाऊन जरांगे पाटील यांची भेट घेतली यावेळी त्यांनी त्यांच्याशी उपोषणाच्या संदर्भात चर्चा करत या आंदोलनाला मानवत तालुका सकल मराठा समाजाचा पाठिंबा जाहीर केला यावेळी गोविंद घांडगे, राजेभाऊ होगे, अंगद नन्हेर,बाळासाहेब पौळ,मानोलीचे उपसरपंच लक्ष्मण शिंदे, बाजार समितीचे संचालक सुरज काकडे, हनुमान मस्के, माधव नाणेकर, गजानन होगे, अमीर अन्सारी, बालाजी टाक, कृष्णा शिंदे,आमोल कदम,गजानन बारहाते उपस्थित होते

Share now