आम मुद्देताज्या घडामोडीमहाराष्ट्र रोखठोक

त्या चार इंग्रजी शाळा अधिकृतच आहे गट शिक्षण अधिकारीयांनी दिली ग्वाही

त्या चार शाळेत विद्यार्थांना नियमित शाळेत पाठवण्याचे गट शिक्षणाधिकारी शिवाजी गिते यांचे पालकांना आवाहन.

पाथरी प्रतिनिधी.पाथरी शहरातील गेल्या पाच ते सात दिवसांपुर्वी अनेक वर्तमानपत्रांत पाथरी शहरातील इंग्रजी माध्यमाच्या शाळा बंद करण्याचे आदेश देण्यात आल्याचे बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या त्या अनुषंगाने त्या संबंधित शाळेत शिकणाऱ्या मुलांच्या पालकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला होतापाथरी पोलिस मित्र परिवार व समन्वय समितीचे अहमद अन्सारी व उध्दव इंगळे यांनी या विषयी पाथरी गटशिक्षणाधिकारी शिवाजी गिते यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी पालकांच्या मनातील संभ्रम दुर करण्यासाठी तसेच मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून लेखी स्वरूपात माहिती

दिली की पाथरी तालुक्यातील १) गोल्डन ड्रिम इंग्लिश स्कूल पाथरी २)जिनियस किड्स इंग्लिश स्कूल पाथरी ३) लिट्ल फ्लॉवर इंग्लिश स्कूल पाथरी ४) गोदावरी दुधना इंग्लिश स्कूल पाथरी या शाळेला शासनाची मान्यता आहे व संबंधीत शाळेचे युडायस नंबर बंद केलेले नाही तेव्हा संबंधित शाळेतील पालकांनी कोणत्याही प्रकारचा मनात संभ्रम न ठेवता आपल्या पाल्यांना नियमित शाळेत पाठवावे जेणेकरून आपल्या पाल्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही असे एका पत्राद्वारे पाथरी गट शिक्षणाधिकारी यांनी सांगितले

Share now