आम मुद्देताज्या घडामोडी

स्टेट बँक च्या मॅनेजर सोबत व्यापारी महासंघाची बैठक यशस्वी

माजलगाव प्रतिनिधी फेरोज इनामदार स्टेट बँक च्या मॅनेजर सोबत माजलगाव तालुका व्यापारी महासंघाची बैठक यशस्वी तालुका अध्यक्ष सुरेंद्र रेदासनी सर्व व्यापारी बांधवांना सुचित करण्यात येते की काल स्टेट बँक ऑफ इंडिया नवीन बस स्थानकासमोरील शाखा येथील मॅनेजर साहेबांशी चर्चा झाली, त्यांचे म्हणणे असे आहे की आम्हाला चांगल्या व्यापाऱ्यांना कर्ज सुविधा द्यायची आहे ज्यात सीसी टर्म लोन इत्यादी तसेच ते व्यापाऱ्यासाठी सेपरेट काउंटर पण देण्यास तयार आहेत ज्यात आपण

एकाच खिडकीत पैसे काढू भरू शकता व इतर सुविधा सुद्धा एकाच खिडकीमध्ये व्यापाऱ्यांसाठी सेपरेट करण्यास ते तयार आहेत, ज्यांना या सुविधेचा लाभ घ्यायचा त्यांनी मॅनेजर साहेबांशी भेटून चर्चा करावी किंवा मला भेटावे, ते स्वतःहून व्यापाऱ्यासाठी इतक करत आहेत, त्यांचे व्याजदर पण इतर बँका पेक्षा कमी आहेत ही सुवर्णसंधी आहे तरी ज्यांना या संधीचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी मॅनेजर साहेबांशी भेटून चर्चा करावी, आपली मदत करायला सदैव तयार आहे असे मॅनेजर साहेबांनी तालुका अध्यक्ष
सुरेंद्र रेदासनी, यांना करणायचे कळवले आहे

Share now