ताज्या घडामोडीमहाराष्ट्र रोखठोकराजकिय घडामोडी

अंबड नागरी सहकारी पंतसंस्थेच्या नवीन संचालक मंडळाची निवड चेअरमन पदी मा.आ.शिवाजी चोथे बिनविरोध

अंबड प्रतिनिधी :- दिनांक .१० शनिवार रोजी अंबड येथील अंबड नागरी सहकारी पतसंस्था मर्या. अंबड येथे नुकत्याच सभासदांनामधुन पुढील पाच वर्षाच्या कार्यकाळासाठी निवड केलेल्या पंधरा सदस्यीय नवीन संचालक मंडळाने अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची आज झालेल्या निवड

समीतीच्या बैठकीत बिनविरोध निवड झाल्या असून अध्यक्षपदी माजी आमदार शिवाजीराव चोथे व उपाध्यक्षपदी बाळासाहेब उर्फ जयाजी सिताराम पांढरे यांची निवड झाली आहे. तसेच पतसंस्थेच्या व्यवस्थापक श्री महादेव रायकर यानी नवीन निवड झालेले संचालक श्री हनुमान कुंडलिकराव धांडे, श्री सतीश दगडूलाल सोडानी , श्री खरात बाळासाहेब विष्णुपंत, श्री चोथे विनायक शिवाजीराव, श्री लांडे राम भिवराजी,

श्री खटके श्रीमंत तुकाराम ,श्री कुरेशी इब्राहिम, श्री दीडपोळे कन्हैयालाल पुंजाराम, श्री वराडे रमेश माणिकराव, श्री उदावंत मनीष मधुकरराव, श्री गाडेकर शिवाजी आत्माराम तसेच संचालिका पदी काकडे अनिता दिनेश व मस्के प्रियंका सचिन यांचे शाल, पुष्पहार देऊन बिनविरोध निवडी बद्दल स्वागत सत्कार केले. यावेळी सर्व संचालकानी नवनियुक्त चेअरमन व वा. चेअरमन यांचे शाल, पुष्पहार व मिठाई भरवत अभिनंदन केले

तसेच चेअरमन श्री चोथे यांनी सर्वांचे आभार मानत पुढील पाच वर्षासाठीचे पतसंस्थेच्या विकासाचा आराखडा व मनसुबा मनोगतातुन व्यक्त केला. श्री रायकर यांनी नवनियुक्त संचालकांना पतसंस्थाचा संपुर्ण अहवाल देत लेखा जोखा सादर केला. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून डीबी बावस्कर यांनी काम पाहिल.

Share now