क्राईमताज्या घडामोडी

चोरी गेलेला मिनी ट्रक पोलिसांनी मिळवला परत आरोपीस धुळे येथून अटक.

माजलगाव शहर पोलिसांनी कामगिरी. माजलगाव प्रतिनिधी फेरोज इनामदार दिनांक 26/05/2023 रोजी एक वाळू ने भरलेला मिनी ट्रक तहसील कार्यालय चे कंपाऊंड चे कुलूप तोडून चोरीस गेला होता. यातून अज्ञात चोरट्या विरुध्द गुरन 172/2023 कलम 457,454,380 भादवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. CCTV फुटेज आणि माहितीगार

लोकांचे मार्फत मदत घेऊन यातील चोरट्यास मिनी ट्रक सह धुळे येथून अटक करण्यात आली आहे. चोरट्यांचे नाव अलीम खदीर शेख वय 26 वर्षं रा.कुंभारीपींपळगाव तालुका, घनसावंगी, जिल्हा जालना असे आहे. त्याची पोलिस कोठडी घेण्यात आलेली आहे . ही कामगिरी पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, सहायक पोलिस अधीक्षक पंकज कुमावत यांचे मार्गदर्शन नुसार, पो नि शितलकुमांर बल्लाळ, जमादार राम भंडाने, गणेश नागरे.

Share now