जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हस्तपोखरी येथे रक्षाबंधनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात
अंबड प्रतिनिधी :- जिल्हा परीषद प्राथमिक शाळा हस्तपोखरी येथे चिमुकल्या विद्यार्थ्यांचा रक्षाबंधनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक सुभाषराव हर्षे सर, नावीन्यपूर्ण उपक्रम राबविणारे उपक्रमशील शिक्षक दत्तात्रय शिंदे सर, दत्ताजी घायाळ सर, योग शिक्षक गजानन पांडुरंग पुरी सर, शिक्षिका सुवर्णा घुगे मॅडम, शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य शिवाजी गाढे आदींच्या
प्रमुख उपस्थितीत चिमुकल्या विद्यार्थ्यांचा रक्षाबंधनाचा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी लहान चिमुकल्या विद्यार्थ्यांनी रक्षाबंधनाच्या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला आहे.यावेळी शाळेतील सर्व विद्यार्थिनींनी शाळेतील सर्व शिक्षकवृंदाना व आपल्या लाडक्या भाऊरायाला राखी बांधून औक्षण केले. तसेच विद्यार्थ्यांनी आपल्या बहिणींने बांधलेल्या राखीचे रक्षण
करण्याची प्रतिज्ञा केली. व रक्षाबंधनाचे महत्व,रक्षाबंधनाचा अर्थ, इतिहास विद्यार्थांना सुभाषराव हर्षे सर, दत्ताजी घायाळ सर, दत्तात्रय शिंदे सर, योग शिक्षक गजानन पांडुरंग पुरी सर, सुवर्णा घुगे मॅडम यांनी उत्कृष्ठ रित्या समजावून सांगितले
यावेळी समुदाय अधिकारी,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सरपंच, उपसरपंच, सदस्य, पत्रकार, आदी गावकरी मोठया संख्येने उपस्थित होते.