ताज्या घडामोडीमनोरंजन

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोंधळवाडी येथे योग शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न

अंबड प्रतिनिधी :- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोंधळवाडी येथे योग शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न झाले.यावेळी योग शिक्षक गजानन पांडुरंग पुरी सर यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे गुणवान, शिस्तप्रिय विद्यार्थीप्रिय मुख्याध्यापक गौतम अवधूत सर, दैनिक जगमित्र वृत्तपत्राचे तालुका प्रतिनिधी शेख फारुक, दैनिक जगमित्र वृत्तपत्राचे घनसावंगी तालुका प्रतिनिधी मारोती सावंत, दैनिक जगमित्र वृत्तपत्राचे ताडहादगाव सर्कल

प्रतिनिधी गणेश पाटोळे, उपक्रमशील शिक्षक मिरकड सर, शिक्षिका वायकर मॅडम, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सरपंच, उपसरपंच आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत योग शिबिर घेण्यात आले.यावेळी विद्यार्थ्यांना उत्कृष्टरित्या योगा व विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात

आले.यावेळी सर्वप्रथम स्त्री शिक्षणाच्या जनक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.व प्रमुख पाहुण्यांचे स्वागत मुख्याध्यापक श्री गौतम अवधूत सर, संदीप मिरकड सर, शकुंतला वायकर मॅडम यांनी केले.सुक्ष्म हालचाली, यौगिक प्रार्थना, प्रार्थनेचे महत्व, सूर्य नमस्कार, त्याचे बारा प्रकार मंत्रोच्चारात, योगाचे महत्त्व,व दीर्घ श्वसन, कपालभाती,भ्रामरी,शित्कारी, अनुलोम विलोम आदी प्राणायाम

त्यांची व्याख्या, निषेध, कृती, लाभ, फायदे, दक्षता, घ्यावयाची काळजी,योग साधनेमुळे शरीरावर होणारा बदल,योगाचा इतिहास विद्यार्थ्यांना योग शिक्षक गजानन पांडुरंग पुरी सर, मुख्याध्यापक गौतम अवधूत सर, उपक्रमशील शिक्षक संदीप मिरकड सर, शकुंतला वायकर मॅडम यांनी उत्कृष्ट रित्या समजावून सांगितले तसेच शाळेत राबविणाऱ्या उपक्रमाविषयी सविस्तर माहिती पाहुण्यांना सांगण्यात आली.यावेळी समुदाय अधिकारी डॉ.गीता शंकर मॅडम,

आरोग्य सेवक डॉ.अफसर पठाण, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सरपंच, उपसरपंच, पत्रकार, डॉक्टर, इंजिनिअर, अंगणवाडी सेविका मदतनीस, आशाताई, जेष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share now