आम मुद्देताज्या घडामोडी

चिमुकल्यांसह तरुण, वायोवृद्ध त्रस्त रुग्णालयामध्ये गर्दी

भोकरदन प्रतिनिधी. भोकरदन शहरासह ग्रामीण भागात सध्या डोळ्यांच्या आजाराची साथ सुरू झाली आहे.लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत हा संसर्ग पोहचत आहे. डोळ्यात बॅक्टेरिअल इन्फेक्शनचे प्रकार वाढल्याने अनेकांना ही लागण होत आहे.घरातील एकाला इन्फेक्शन झाले की संपूर्ण कुटुंबाला याची लागण होत असल्याचे दिसून येत आहे.सध्या ग्रामीण रूग्णालयात अशा रुग्णांची गर्दी वाढली आहे.सदर साथरोगाबाबत ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकिय अधीक्षक डॉ.सुनंदा कथार व वैद्यकिय डॉ.सोंन्नी यांनी

माहिती देताना सांगितले की, डोळे येणे म्हणजे एक प्रकारचा बॅक्टरिया अथवा व्हायरसमुळे होणारा जंतू संसर्ग असून यामध्ये डोळे लाल होणे, छोटा होणे,डोळ्यांना चीपड येणे, डोळ्यांच्या पापण्यांना सूज येणे,डोळ्यांतून पाणी येणे,उजेडाकडे बघायला त्रास होणे असे लक्षणे दिसून येत आहेत.तर संसर्ग टाळण्यासाठी वारंवार डोळ्यांना हाक लावणे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे आवश्यक असल्यास डोळ्यांवर गॉगल वापरावा, बाहेरून आल्यावर हात स्वच्छ धुवावे.जर घरातील व्यक्तीचं डोळे आले असल्यास त्यांच्यांशी संपर्क टाळावा,डोळे पुसायला रुमाल न वापरता टिश्यू पेपर वापरावे आणि वापर झाल्यावर फेकून द्यावे,डोळे पूर्ण बरे होईपर्यंत घरी

आराम करावा व ड्रॉप्स व्यवस्थित टाकावे आणि लहान मुलांपासून लांब रहावे,असा सल्ल ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक सुनंदा कथार व वैद्यकिय डॉ. सोन्नी यांनी दिला.प्रतिक्रीया ही काळजी घेण्याची गरजडोळ्यांना वारंवार हात लावू नये.हाथ साबणाने वारंवार स्वच्छ धुवावे, दररोज स्वच्छ रुमाल व टॉवेल वापरावा.आपण वापरलेला टॉवेल किवा रुमाल दुसऱ्या कुणालाही वापरू देऊ नये.डोळे लाल होणे, डोळा सुजणे, चिपड येणे, डोळा दुखणे यांपैकी कोणतीही लक्षणे असल्यास लगेच

नेत्रतज्ज्ञांचा सल्ला घेऊन उपचार करावा. रुग्णालयात दर रोज ३० ते ४० रूग्ण येत आहे.सोमवार रोजी ७० ते ८० रुग्णांची नोंद झाली.सुनंदा कथारवैद्यकिय अधिक्षक ग्रामीण भागात डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार करावे.प्रभावित डोळा स्पर्श न करता. व्यवस्थित हात धुणे.डोळ्यांना सारखा हात लावू नये.रुमाल आणि सौंदर्यप्रसाधने एकमेकांचे वापरणे टाळावे.हि साथ पहिल्यांदाच आलेली आहे तरी बाधित रुग्णांनीवेळोवेळी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ड्रॉप व औषधी घ्यावे.

Share now