आम मुद्देताज्या घडामोडीमहाराष्ट्र रोखठोक

वाघाळा गाव परिसरात पावसाचा पंचविस दिवसाचा खंड

वाघाळा गाव परिसरात पावसाचा पंचविस दिवसाचा खंड;ग्रा पं ने ठराव घेत पिकविम्याची केली मागणी.

पाथरी प्रतिनिधी. वाघाळा हे गाव पाथरी महसुल मंडळात येते. शहरा पासुन दक्षिण-पुर्व दिशेला १८ किमी अंतरावर असून या वर्षी जुनच्या शेवटी आणि नंतर २१ जुलैला रिमझिम पाऊस झाला होता.या वरच शेतक-यांनी पेरणी उरकली मात्र दुबार पेरणी केल्या नंतर ही तब्बल पंचविस दिवसाचा पावसाचा खंड पडल्याने सोयाबीन करपली,तर कापसाने माना टाकल्या.या विषयी सोमवारी वाघाळा ग्रामपंचायतीत सरपंच बंटी पाटील यांच्या अध्यक्षते खाली विषेश सभेचे आयोजन करून यात पावसाचा पंचविस दिवसाचा खंड पडल्याने गावातील शेतक-यांना २५ टक्के अॅग्रिम विमा देण्यात यावा असा ठराव घेण्यात आला.

या वर्षी पाऊस लहरी पणे पडत आहे. एका शिवारात पडतो तर दुसरे शिवार कोरडे राहात आहे. पावसाळ्याचे ८० दिवसावर दिवस संपले असतांना पाथरी महसुल मंडळातील वाघाळा या एकमेव गावात जुन च्या शेवटी झालेल्या बारीक रिपरीप पावसावर अनेक शेतक-यांनी मुग, कापुस,तुर, सोयाबीन ही खरीपाची पेरणी केली. मात्र या नंतर मोठा खंड पडल्याने ही पेरणी वाया गेली होती.

परत जुलैच्या तिस-या आठवड्या दिवसभर झालेल्या रिपरीपीवर शेतक-यांनी दुबार पेरणी आटोपली. मात्र या नंतर तब्बल २५ दिवसाचा खंड पडल्याने सोयाबीन करपले तर कापसाने माना टाकल्या तर विहिर बोअरचे पाणी कमी झाल्याने ऊसाची चिपाट होत आहे. एकीकडे वाघाळा गावात दुष्कााळाची छाया गडद होत असताना पाथरी या महसुल मंडळाच्या मुख्यालयी पडत असलेल्या पावसाच्या नोंदी मुळे वाघाळा वाशियांचा मात्र पिके जाऊन ही विमामिळणार नसल्याची भावना तिव्र होत आहे.

पर्जन्यमापक यंत्र हे प्रत्येक गावी असलेच पाहिजे ही भावना ही या निमित्ताने बोलली जात आहे. अशीच परिस्थिती बाभळगाव मंडळातील दक्षीने कडील गावात आहे. या विषयी सोमवार २१ ऑगष्ट रोजी वाघाळा ग्रामपंचायत मध्ये सरपंच बंटी पाटील यांच्या अध्यक्षते खाली विषेश सभेचे आयोजन करून यात गावात पावसाचा पंचविस दिवसाचा खंड पडल्याने शेतक-यांना २५ टक्के अॅग्रीम पिक विमा देण्याचा ठराव एकमताने संमत करण्यात आला.

या विषयी आता गावात स्वाक्षरी मोहिम राबऊन प्रशासनाला निवेदन देत गावातील शेतकरी पुढील आंदोलनाची दिशा ठरवत आहेत. या विषयी न्याय न मिळाल्यास प्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची भावना युवा शेतकरी व्यक्त करत आहेत.

Share now