क्राईमताज्या घडामोडी

गोदावरी नदीपात्रात पाच किलोमीटर पाठलाग करुन दोन ट्रॅक्टर पकडले

पाच किलोमीटर पाठलाग करुन दोन ट्रॅक्टर पकडले.

अंबड प्रतिनिधी :- तालुक्यातील हसनापुर येथील गोदावरी नदीपात्रात जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड, अप्पर जिल्हाधिकारी संदीपान सानप उपविभागीय अधिकारी, तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी विठ्ठल गाडेकर, विनोद ठाकरे, कृष्णा मुजगुले, संतोष जैस्वाल,रमेऊ कांबळे, सुनील सोरमारे, प्रफुल्ल मिसाळ,

रामकिसन महाले, स्वप्निल खरात, पोलीस कर्मचारी व कोतवाल पठाडे यांच्या पथकाने मौजे हसनापुर येथील अवैध वाळू उत्खनन करणारे दोन ट्रॅक्टर (केनी )पाच किलोमीटर पाठलाग करुन गोदावरी नदीपात्रात पकडले.ज्याची अंदाजे किंमत १० लाख रुपये असून सदर दोन्ही ट्रॅक्टर पोलीस वसाहत गोंदी येथे लावण्यात आले.दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याची माहिती मिळाली

Share now