ताज्या घडामोडीमहाराष्ट्र रोखठोक

विजय वीरकर यांची माळी महासंघाची परभणी जिल्हा सरचिटणीस पद्दावर निवड

परभणी जिल्हा प्रतिनिधी.परभणी जिल्हातील माळी माहासंघ परभणी जिल्हा सरचिटणीसपदी विजय वीरकर, पाथरी तालुकाध्यक्षपदी विश्वंभर गिराम, मानवत तालुकाध्यक्ष डॉ. संजय हरकळ, सेलू तालुकाध्यक्ष सखाराम कटारे, परभणी जिल्हा उपाध्यक्ष डॉ. उध्दव इंगळे आदींच्या निवडी करून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. या बैठकीस मराठवाडा विभागीय अध्यक्ष देवनाथ जाधव, जालना जिल्हाध्यक्ष संतोष रासवे, महाराष्ट्र प्रदेश संघटक सचिव आसाराम वीरकर,परभणी जिल्हाध्यक्ष संतोष गायकवाड, परभणी महानगर अध्यक्ष कैलास माने आदींची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी समाजातील उच्च शिक्षित विद्यार्थ्यांना उद्योग व्यवसाय करण्यास चालना द्यावी. तसेच त्यांना व्यवसाय करण्यासाठी समाजातील मोठ्या उद्योग व्यावसायिकांनी मदत करावी. यासंदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी कैलास माने, प्रा. रासवे, विजय वीरकर, आसाराम वीरकर यांनी मनोगत मांडले. कार्यक्रमाचाअध्यक्षीय समारोप देवनाथ जाधव यांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रंगनाथ वीरकर यांनी केले तर आभार बी. बी. कोरडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अनिल कोरडे, ज्ञानोबा नाळे, गिराम, नंदकुमार गायकवाड, राम गिराम, गणेश आनंदे, – अक्षय यादव, नारायण पितळे, सतीश – वांगीकर, दामोदर गायकवाड, अॅड. – अशोक गालफाडे, अतुल कोरडे, बड़े नाईक, चिंतामणी गिराम, नबाजी वीरकर, – रमेश आदींनी पुढाकार घेतला.

Share now