मतदारांनी आपले नाव नोंदणी करून घ्याघ्यावे.तहसीलदार वर्षा मनाळे
माजलगाव प्रतिनिधी फेरोज इनामदार.
तहसील कार्यालयांतर्गत निवडणूक विभागामार्फत नव मतदार नोंदणी प्रक्रिया आज दि २१ सष्टेंबर २०२३ पासून सुरु होणार असून सर्व नव मतदारांनी आपले नाव मतदार यादीत नोंदवून घ्यावेत तसेच मतदार यादी मधील माहितीमध्ये दुरुस्ती, वगळणी व स्थालांतर करणे बाबतची कार्यवाही प्रक्रियाही चालु आहे. याचा लाभ नागरिकांनी घेऊन आपले नाव मतदार
यादीमध्ये अचूक समाविष्ट करावे असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी श्रीमती निलम बाफना व सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार श्रीमती वर्षा मनाळे यांनी केले आहे.भारत निवडणूक आयोगाच्यानिर्देशानुसार दिनांक १ जानेवारी, २०२४ या अर्हता दिनांकारवर आधारित मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत माजलगांव तालुक्यातील नव मतदारांची नाव नोंदणी मतदार यादी मधील माहितीमध्ये दुरुस्ती वगळणी व स्थालांतर करणे बाबतची कार्यवाही प्रक्रिया चालु आहे. दिनांक १ जानेवारी, २०२४ या अर्हता
दिनांकावर आधारित मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत एसव्हीइइपी उपक्रम माजलगांव तालुक्यातील १०० टक्के महाविद्यालयमध्ये दिनांक २१ सष्टेंबर २०२३ या एकाच दिवशी नव मतदारांची नोंदणी करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. सदरील मोहिमेचा लाभ सर्व महाविद्यालयातील नवमतदारांनी घेऊन मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट करावे. तसेच माजलगांव तालुक्यातील सर्व मतदान केंद्रस्तरीय् अधिकारी (बीएलओ) व तहसील कार्यालय माजलगांव येथील मतदार मदत केंद्र यांच्या सहाय्याने भटक्या व विमुक्त जमातीमधील नागरिकांचे मतदार
यादी मध्ये नाव नोंदणी करण्याकरिता दिनांक २६ सप्टेंबर २०२३ रोजी शिबीर आयोजित करण्यात येत असुन दिव्यांग मतदार व वंचित घटकांनी मतदार यादीमध्ये नाव नोंदणी करुन घ्यावी तसेच वरील प्रमाणे मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट करण्याकरिता आयोजित करण्यात आलेल्या शिबीराचा लाभ नागरिकांनी घेऊन आपले नाव मतदार यादीतमध्ये समाविष्ट करावे असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी श्रीमती निलम बाफना यांनी केले आहे.