ताज्या घडामोडीमहाराष्ट्र रोखठोकराजकिय घडामोडी

शासन आपल्या दारी मुख्यमंत्री,अर्थमंत्री येऊन दिनदुबळ्या दिव्यांग,वृध्द, निराधार शेतमजुरांना काय न्याय देतील

दिव्यांग,वृध्द,निराधार शेतमजुर, शेतकरी अनेक निवेदन धरने धरून न्याय मिळत नाहि? शासन आपल्या दारी मुख्यमंत्री,अर्थमंत्री येऊन दिनदुबळ्या दिव्यांग,वृध्द, निराधार शेतमजुरांना काय न्याय देतील ?दि,वृ,नि,मि,मं, म. संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे यांचा सवाल

नांदेड जिल्हा प्रतिनिधी. चंपतराव डाकोरे पाटील नांदेड येथे शासन आपल्या दारी दिनांक .२५ जुनं २०२३ रोजी मुख्यमंत्री, अर्थमंत्री येऊन जनतेला शासन आपल्या दारी हा उपक्रम घेऊन शासनाचा लाखो रूपये खर्च करुन खरेच जनतेला न्याय हक्क मिळेल काय?


नांदेड जिल्ह्यातील दिव्यांग,वयोवृध्द यांना २०१९ रोजी दिव्यांग वयोश्री साहित्य मोजमाप तपासणी शिबिर नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये घेऊन हजारो लाभार्थी पडत झडत लाभ मिळेल म्हणून भाग घेतला नांदेड जिल्ह्यातील चौदाशे लाभार्थ्यांना साहित्य येऊन काहि तालुक्यातील ऊदा.नायगाव पंचायत समिती मध्ये वाटप न केल्यामुळे गंजुन खराब झाले ते वाटप व्हावे म्हणुन नांदेड जिल्ह्यातील सर्व तहसिलदार,

गटविकास अधिकारी यांना संंदर्भ ३४ निवेदन अनेक वेळा मोर्चे धरणे, जिल्हाधिकारी साहेबांनी अनेक वेळा संबंधित अधिकारी सोबत बैठक घेऊन न्याय मिळाला नाहि.


शेतकरी बांधवांनी विमा कंपनीला विमा भरून शासनाने दुष्काळ जाहीर करूंन मदत दिली पण विमा कपनीने नुकसान भरपाई दिली नाही ती द्यावी म्हणून अनेक वेळा निवेदन,मोर्चे काढुन शासन अशा कंपनी वर कायदेशिर कार्यवाही करून शेतकऱ्यांच्या आंदोलनाची शासनाने दखल घेऊन न्याय दिला नाहि.


सत्तेत असलेले सरकारने दिव्यांग, वृध्द निराधार यांना दरमहा मिळणाऱ्या अनुदानात पाचशे रुपये वाढ व ते अनुदान दरमहा १० तारखेच्या आत देण्याची घोषणा दि.९ मार्च २०२३ ला करून त्यांचा जिआर अद्याप काढला नाहि.


दिव्याग कायदा २०१६ च्या कायद्याची अंमलबजावणी होत नसल्याने आजहि नांदेड जिल्ह्यातील आठ ठिकाणी दिव्यांगाच्या कमकुवत असलेला फायदा घेऊन त्यांच्या जमिनीवर,घरावर , जागेवर अतिक्रमण केल्याची तक्रार लोकशाही दिनी बारा महिन्यांपासून जर न्याय मिळत नसेल तर जनता दिन कशासाठी


दिव्यांग कायद्याप्रमाणे दप्तर दिरंगाई कायद्याप्रमाणे संबंधितांवर का कार्यवाही होत नाहि.असे कायदे करून दिव्यांगा ना म़ोर्चे, धरने आंदोलन करण्याची वेळ येते आहे.


शासन जनता दरबारी येऊन तरी दिनदुबळ्या दिव्यांग, वृध्द निराधार, शेतमजूर, शेतकऱ्यांना न्याय देतील काय?असे प्रसिद्धी पत्रकाद्वारे चंपतराव डाकोरे पाटील यांनी दिली

Share now