ताज्या घडामोडीमनोरंजनमहाराष्ट्र रोखठोक

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व मत्स्योदरी विद्यालय हस्तपोखरी येथे जागतिक योगा दिवस मोठया उत्साहात संपन्न

मत्स्योदरी विद्यालय हस्तपोखरी येथे जागतिक योगा दिवस मोठया उत्साहात संपन्न.

अंबड प्रतिनिधी :- तालुक्यातील हस्तपोखरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र धनगर पिंपरी अंतर्गत उपकेंद्र हस्तपोखरी येथे योगशिक्षक गजानन पांडुरंग पुरी सर यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री.सुभाषराव हर्षे सर, मत्स्योदरी विद्यालयाचे मुख्याध्यापक

श्री.प्रकाशजी गुंजकर सर,समूदाय अधिकारी डॉ. अरुणराव घुले साहेब, शिक्षक दत्तात्रय शिंदे सर, केदारे सर, सरोदे सर, राजपूत सर, वाघ सर, नजीब सर, कोळी सर, शिंदे सर, बोडखे सर, दत्ताजी घायाळ सर, सुवर्णा घुगे मॅडम, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दत्ता वाघ, शिवाजी गाढे आदी गावकऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत योगा दिवस मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी मनगट,डोळे,खांदे,मान,बोटे यांच्या सूक्ष्म हालचाली,यौगिक प्रार्थना,सूर्य नमस्कार,त्याचे बारा प्रकार मंत्रोच्चारात,योगाचा इतिहास,२१ जून हा दिवस जागतिक योगा दिवस म्हणून का साजरा केला जातो,योगा दिनाचे महत्त्व, योगा दिवस हा जागतिक योगा दिवस म्हणून केंव्हा साजरा करण्यात येतो यांची सविस्तर माहिती, तसेच व्यायाम केल्याने सदृढ दीर्घायुष्य लाभते,नितळ त्वचा, चमकदार केस आणि निरोगी नखे,

शरीरातील अवयवांचा एकमेकांशी उत्तम समन्वय साधला जातो,शरीराची कार्यक्षमता वाढते,मन सकारात्मक राहते.आदी सूर्य नमस्कारा विषयी सविस्तर माहिती.पर्वतासन्,वृक्षासन, ताडासन,त्रिकोनासन,आदी आसने व कपाभाती,दिर्घश्वसन, भ्रामरी,अनुलोम विलोम आदी प्राणायाम घेण्यात येऊन त्याची व्याख्या,निषेध,कृती,फायदे, दक्षता,घ्यावयाची

काळजी,आदी विषयी सविस्तर माहिती सुभाषराव हर्षे सर, प्रकाश गुंजकर सर,योगशीक्षक गजानन पांडुरंग पुरी सर,केदारे सर,यांनी विद्यार्थी व गावकरी यांना समजावून सांगितले.यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष,उपाध्यक्ष,सरपंच, उपसरपंच,पत्रकार,पोलीस पाटील,ज्येष्ठ नागरिक, अंगणवाडी सेविका,मदतनीस, आरोग्यसेविका आदी गावकरी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share now