आम मुद्देताज्या घडामोडीमनोरंजन

रत्नेश्वर माहात्म. धनंजय महाराज रामपुरीकर

पाथरी पासुन सात कि.मी अंतरावर तिर्थक्षेत्र रामपुरी हे गाव आहे.या गावचे वैशिष्ट्य म्हणजे गावापासुन एक किलो मीटर अंतरावर श्रीरत्नेश्वराचे भव्य मंदिर आहे अतिशय निसर्गरम्य परिसरात हे मंदिर वसले आहे मंदिराच्या दक्षिण दिशेला पायथ्याशी गोदावरी नदी वाहते.असंख्य वृक्षांनी सर्व मंदिर आच्छादुन गेले हि निसर्गाची किमया येथील वैशिष्ट आहे मंदिरा ची पौराणिक कथा अशी आहे.गंगा महात्मा नुसार एक शापित यक्षणी या ठिकाणी आली होती व गंगे मध्ये विलीन झाली होती मग तिचा पती यक्षेश्वर पत्नी च्या शोधात येथे आला

या ठिकाणी त्यानी महादेवाची तपश्चर्या करुन तो यक्ष महादेवा भवती टेकडी बनला व पत्नी प्रमाणे गंगेत विलीन झाला.त्याच काळात अयोध्या पती श्रीराम परीवारा समेत पर्यटन करत असता रामपुरी येथे वास्तव्यास आले अतिशय निसर्गरम्य वातावरण पाहून श्रीराम तीन दिवस रामपुरी येथे वास्तव्यास होते.एक दिवस श्रीरामानी पाहिलें आज ज्या ठिकाणी रत्नेश्वर लिंग आहे त्या ठिकाणी त्यांनी एक टेकडी पाहिली आणी त्या टेकडी वर काळी कपिला गाय दुधाचा पाणा त्रिकाल सोडायची श्रीरामाला विलेक्षण वाटले त्या वेळेस श्रीरामानी यक्ष टेकडी चा निशाणा धरुन बाण सोडला त्या वेळेस चमत्कार झाला सोडलेला बाण परत श्रीरामाच्या पायापाशी येऊन पडला त्या वेळेस श्रीरामाला आश्चर्य वाटले त्यांनी सैनिकांच्या हातांनी शहानिशा केली त्या वेळेस त्यांना स्वयंभु रत्नेश्वराचे लिंग दिसले त्या वेळेस श्रीरामानी वैदिक ब्राह्मणांना पाचारण करुन लिंगावर रत्नांचा अभिषेक केला.त्या दिवसापासून लिंगाला रत्नेश्वर नाव पडले.ज्याच्या कंठात सारखं पाणी बुडबुड्या मारते.रत्नेश्वर लिंगात पार्वती विराजमान आहे.रत्नेश्वर लिंगाला नाभी आहे त्या नाभित पण पाण्याचे बुडबुडे पाहव्यास मिळतें.रत्नेश्वर लिंगा जवळ श्री गणेश विराजमान आहेत गाभार्या च्या बाहेर भव्य नंदी ची मुर्त आहे संपुर्ण मंदिर हेमाडपंथी आहे या मंदिराच निर्माण.ई.सन कोणी सांगु शकत नाही आज हि रामपुरी ची ओळख रत्नेश्वरा मुळे महाराष्ट्र त आहे आज हि दुर दुरुन भाविक दर्शनासाठी येतात व निसर्गरम्य वातावरणाचा आनंद लुटतात रत्नेश्वर दर्शनानी मनातील ईच्छा पुर्ण होतात हा भाविक भक्तांचा विश्वास आहे येथील दैनंदिन दर्शनाला यात्रेच स्वरूप आहे तरी महाशिवरात्री हा मुख्य गावचा उत्सव असतो.

या दिवशी दुरुन दुरुन भाविक येऊन रत्नेश्वर दर्शना साठी लाखांनी यात्रा भरते महाशिवरात्री पासुन चार दिवस अन्नदान भजन किर्तन करुन देव पालखी मध्ये बसुन गावाची परीक्रमा करतात व उत्सवाची सांगता होते.श्रावण महिना पण येथील वैशीष्ट आहे. हिरवेगार वृक्ष वेलीने संपुर्ण मंदिर सजवुन जाते.पंचक्रोशीतुन भक्त दर्शनासाठी येतात या ठिकाणी एक वृक्ष आहे जिथे श्रीराम बसले होते आज हि त्या वृक्षावर राम राम अक्षर पाहावयास मिळतात.असंख्य चमत्कार रत्नेश्वराचे पाहिला मिळतात गावावर जर संकट येणार असेल तर.रत्नेश्वराच्या कंठातील पाणी आटते मग गाईच्या दुधाचा अभिषेक केला तर दुध मध्ये जाते व दुधातील पाणी बाहेर पडते.कठातील पाणी वर येऊन गावावरील संकट टळते असा गावकऱ्यांचा विश्वास आहे.श्रीराम या परीसरात वास्तव्यास होते याचा पुरावा म्हणजे त्यांची वानरसेना रात्रं दिवस परीसरात पाहावयास मिळते. अशी माहिती धनंजय महाराज रामपुरीकर व रामगुरु मुळी यांनी पत्रकारांना दिली.

Share now