ताज्या घडामोडीमहाराष्ट्र रोखठोक

मानवत मल्टीस्पेशियालिटी हॉस्पिटल आता झाले पेपरलेस

मानवत /रियाज शेख

मानवत : आपण वापरत असलेला कागद हा वृक्ष तोडून बनविला जातो आणि याच कागदाच्या वापर कमी केला तर अनेक वृक्षांना तोडण्यापासून वाचविले जाऊ शकते हे ध्येय ठेऊन मानवत मल्टि- स्पेशियालिटी हॉस्पिटल पूर्णपणे पेपरलेस करण्याचा निर्णय घेण्यात आला असा निर्णय घेऊन अमलात आणणारे मानवत येथील डॉ.एन.बी. दगडू यांचे हे हॉस्पिटल मराठवाड्यातील पहिलेच हॉस्पिटल ठरले आहे.


याकरिता प्रेस्को अँप उपयुक्त ठरले असून हा मुंबईमधील दोन युवकांनी एकत्र येऊन तयार केलेला अँड्रॉइड अँप यशस्वी वापर गेल्या चार वर्षापासून भारतामधील ५०० हुन अधिक हॉस्पिटल करत आहेत. याचमुळे सुमारे ४ कोटी कागदांची एका वर्षात बचत होऊन ५ हजाराहून अधिक झाडे वाचली. या टॅबवरील अँपचा वापर सुलभ आहे. टॅब सोबत येणाऱ्या विशिष्ट पेनाने त्यावर लिहिता येते.


या साठी प्रेस्कोचे विक्रम तोतरे, भारत नरहरी, प्रियांका रंदाळे यांनी तसेच हॉस्पिटलचे मार्गदर्शक गणेश मोरे पाटील, डॉ.मनीषा गुजराथी, कुलदीप दगडू यांनी पुढाकार घेऊन परिश्रम घेतले.

Share now